आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल यांनी कंपन्यांना वाचवले, 3.5 अब्ज कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल फोर्स्ट यांनी २००७ मध्ये आेपको हेल्थ कंपनीची स्थापना केली. ही त्यांची पहिली कंपनी नव्हती. यापूर्वी एका पार्टनरच्या सहकार्याने त्यांनी  की फार्मास्युटिकल्स नावाची कंपनी स्थापली होती. १९८६ मध्ये त्यांनी ही कंपनी विकली. ८३५ दशलक्ष डॉलर्समध्ये हा व्यवहार झाला होता. ही त्यांची पहिली कंपनी होती. याची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली होती. तेव्हा मियामीमध्ये प्रॅक्टिस करताना त्यांनी बायोप्सीला सोपे करणारे डिस्पोजेबल उपकरण विकसित केले होते. 
 
त्यांना वाटले की रुग्णाच्या निदानासाठीदेखील हे उपयुक्त आहे. शिवाय बाजारातदेखील याचा वापर होईल. १९८७ मध्ये त्यांनी जेनेटिक ड्रग मेकर कंपनी आयवाक्सची स्थापना केली. २००५ मध्ये या कंपनीला त्यांनी तेवा फार्मास्युटिकल्सला ७.६ अब्ज डॉलर्समध्ये विकले. शून्यातून अब्जावधींचा नफा कमावण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी तोट्यात सुरू असलेल्या आैषधनिर्मिती कंपन्या अधिग्रहित करून त्यांना नफ्यात विकले.  

१९३६ मध्ये दक्षिण फिलाडेल्फियामध्ये त्यांचा जन्म झाला होता. इटालियन मार्केटमध्ये त्यांच्या वडिलांचे शू दालन होते. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर त्यांचे घर होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी काम सुरू केले. पॉकेटमनी कमावण्यासाठी त्यांनी स्थानिक हार्डवेअर स्टोअरमध्ये नोकरी केली. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी पॅरिस विद्यापीठात शिक्षण घेतले. १९५५ आणि १९५६ ही दोन वर्षे ते येथे होते. अभ्यासक्रम मध्येच सोडून त्यांनी १९५७ मध्ये पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला. पेन्सिल्व्हानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे फ्रेंच साहित्यात त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.  

येथे शिकत असताना त्यांच्या कोपरावर गाठ आली. ते त्वचारोग तज्ज्ञांकडे गेले. त्यांच्याकडून उपचार घेतले. त्वचारोग तज्ज्ञ म्हणून करिअर करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला. शुल्क आणि राहण्यासाठी पैसा नव्हता. न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आइन्स्टाइन वैद्यकीय महाविद्यालयाची स्कॉलरशिप त्यांना मिळाली. करिअरची सुरुवात अमेरिका सार्वजनिक आरोग्य सेवेपासून झाली. ते येथे लेफ्टनंट कमांडर म्हणून रुजू झाले. ३ वर्षे येथे काम केले. नंतर मियामी विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये डर्मिटॉलॉजीचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले.
 
येथे काम करताना १९७१ मध्ये डिस्पोजेबल बायोप्सी डिव्हाइस विकसित केले. ते निष्णात डॉक्टर होते. नंतर उत्तम बिझनेसमन म्हणूनदेखील त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. एक आर्थिक अडचणीत असलेली औषध कंपनी त्यांनी खरेदी केली. की फार्मास्युटिकल्स असे त्या कंपनीचे नाव होते. यासाठी पैसा दिला नव्हता. केवळ भागांचे अधिग्रहण केले. यापूर्वी त्यांनी अल्ट्रासाउंड तंत्राच्या माध्यमातून दात साफ करण्याच्या तंत्राचे अधिकार खरेदी केले होते. 

सुरुवातीला आर्थिक चणचण होती. मात्र, या कंपनीने नंतर दम्याच्या रुग्णांसाठी टाइम रिलीज कॅप्सूल्स बाजारात उतरवली आणि नफा कमावला. १९८६ मध्ये ही कंपनी विकल्यानंतर ८३५ दशलक्ष डॉलर्सपैकी फिल यांना १०० दशलक्ष डॉलर्स हिस्सा मिळाला. याच्या एक वर्षानंतर आयवाक्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. तीन कंपन्या मिळून याची स्थापना झाली होती. नवी उत्पादने विकसित करण्याचा सपाटा त्यांनी लावला.
 
फिल येथे अध्यक्ष आणि सीईआेदेखील होते. १९९० पर्यंत त्यांनी डर्मिटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली. नंतर संपूर्ण लक्ष बिझनेसवर केंद्रित केले. लॅटीन अमेरिका आणि युरोपात याचा विस्तार केला. २००६ मध्ये इस्रायलची कंपनी तेवा फार्मास्युटिकल्सचे ७ अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहण केले. या कंपनीत ते पहिले उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष झाले. २००७ मध्ये अनेक छोट्या औषध कंपन्यांना मर्ज करून आेपको हेल्थ फार्मा कंपनी स्थापन केली. याशिवाय अनेक औषध कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते असून त्यात गुंतवणूक केली आहे.
 
- साहित्यात पदवी शिक्षण घेतले. कोपराला गाठ आल्याने उपचार घेण्यास गेले असता डर्मिटॉलॉजीमध्ये करिअर करण्याचा सल्ला तेथे मिळाला.  
- १९८६ मध्ये पहिली कंपनी विकली तेव्हा त्यातून त्यांना १०० दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. 
- दिवाळखोर कंपन्यांना खरेदी केले आणि नफा कमावला. त्यांना औषधशास्त्रातले वॉरेन बफेट म्हटले जाते. एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर्स. 
बातम्या आणखी आहेत...