आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याच्या चितळेंनी असे केले संधीचे सोने, आता कोट्यवधी रुपये टर्नओव्हर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दुग्धोत्पादनांसाठी दररोज 4 लाख लिटर्स दूधाचे संकलन, म्हशींना खाद्य देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्ण काम संगणकावर, असा जगातला पहिला सुसज्ज गोठा. म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारे जगातले पहिले केंद्र, त्याचबरोबर दररोज तीन टन बाकरवडी. सोबतच इतर खाद्यपदार्थ, ऑनलाइन ऑर्डरची सुविधा. तुम्ही महाराष्ट्रात असा की जगाच्या कोनाकोपऱ्यात खाद्यपदार्थ वेळेत पोहोचणारे व्यवस्थापन. अल्पावधीत अवाढव्य उद्योग विस्तारलेल्या 'चितळे बंधू' यांच्या व्यावसायिक यशाचे रहस्य दडलंय ते सांगली जिल्ह्यात कृष्णेकाठी असलेल्या भिलवडीत...

कै.रघुनाथराव भास्कर चितळे उर्फ भाऊसाहेबांचे वडील भास्कर गणेश चितळे हे या उद्योगी घराण्याचे आद्यपुरुष! कै.भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे रुपांतर आज भल्या मोठ्या वटवृक्षात झाले आहे. 1936 च्या सुमारास सांगली जिल्ह्यात कृष्णेकाठी असलेल्या भिलवडी गावात सुरू झालेल्या दुधाच्या व्यवसाय अाज मोठ्या उद्योग समूहांच्या यादीत झळकला आहे. हे उद्योग जगतातील एक दिग्गज पाऊलच म्हणावे लागेल.

भाऊसाहेबही आज हयात नाहीत. पण त्यांनी यशस्वीपणे पुढे आणलेला 150 लिटर्स दुधाचा धंदा आज दररोज रोज 4 लाख लिटर्स दूध संकलनावर पोहचला आहे. चितळ्यांनीच भिलवडी परिसराचा कायापालट केला असे कौतुकाने म्हटले जाते. समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून चितळेंनी भिलवडीत सामाजिक कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

चला तर मग, पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचू या, चितळे उद्योग समुहाचा प्रेरणादायी प्रवास.... बाकरवडीचा खमंग सुहास दरवडतोय विदेशात...
बातम्या आणखी आहेत...