आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी फॅमिलीतील या मुलाचा वडीलांप्रमाणेच 24 व्या वर्षी झाला डायरेक्टर बॉडीत समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिना अंंबानींंसोबत जय अनमोल - Divya Marathi
टिना अंंबानींंसोबत जय अनमोल
मुंबई- अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल याचा हजार कोटी रुपयांचे भांडवली मूल्य असलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या या यादीत अतिरिक्त संचालक (अॅडिशनल डायरेक्टर) म्हणून जय अनमोल यांना जागा मिळाली आहे. अनिल अंबानी यांच्याप्रमाणेच वयाच्या 24 व्या वर्षी जय अनमोल यांना कंपनीत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

33 वर्षांपूर्वी 1983 मध्ये धीरूभाई अंबानी यांनी 24 वर्षीय अनिल अंबानी यांचा रिलायन्समध्ये प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून संचालक मंडळात समावेश केला होता. विशेष म्हणजे अनिल अंबानींचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांचादेखील वयाच्या 24 व्या वर्षी रिलायन्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला होता. तसेच मुकेश यांची जुळी मुले ईशा आणि आकाश यांनाही वयाच्या 24 व्या वर्षी कंपनीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. अनिल यांचा छोटा मुलगा जय अंशुल सध्या 20 वर्षांचा आहे.

जय अनमोल यांना हे महत्त्वाचे पद देण्याआधी त्यांनी रिलायन्स कॅपिटलच्या विविध आर्थिक तसेच बिझनेस सेवांमध्ये दोन वर्षे काम केलेले आहे. हा त्यांच्या प्रशिक्षणाचाच एक भाग होता. पुढील महिन्यात होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेनंतर ते कंपनीचे कार्यकारी संचालक बनतील.

मी कंपनीच्या बिझनेस वाढीत तसेच विकासासाठी आपल्या अनुभवाचा वापर करणार आहे तसेच कंपनीत योगदान देण्यासाठी मी तयार असल्याचे मत रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळात समावेश झाल्यानंतर जय अनमोल यांनी व्यक्त केले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, ही अंबानी फॅमिली, मोलमजुरीने झाली होती सुरूवात, आज देशात सर्वात श्रीमंत
बातम्या आणखी आहेत...