आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महान उद्योजकांची प्रेरणा: सर्कस दाखवून अब्जाधीश बनले, अंतराळातही गेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गी लालिबेरटे यांचा  "सिर्क डी सोले' जगातील सर्वात मोठा लाइव्ह इंटरटेनमेंट ग्रुप आहे. एक अनोखा आणि जटील स्वरूपाचा सर्कस शो म्हणून याची ओळख आहे. आतापर्यंत सिर्क डी सोले यांच्या समूहाने जगभरातील ४०० शहरामध्ये सुमारे १६ कोटी लोकांचे मनाेरंजन केले आहे.  लालिबेरटे यांनी ‘स्ट्रीट परफॉर्मर’ च्या रुपात कॅनडाच्या क्युबेक शहरातून करिअर सुरू केले. ते फायर-ब्रीदर व स्टिल्ट-वॉकरच्या कसरती करत असत. १९८४ मध्ये त्यांनी सिर्क डी सोल सुरू केला. त्या वर्षी कॅनडाच्या शोधास ४५० वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्त सरकारने त्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण ठेवले होते. यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे कंत्राट मिळाले होते. या पैशातून त्यांनी सर्कस सुरू केली. ३० वर्षे त्यांनी ही सर्कस चालविली. २०१५ मध्ये याचे ९० टक्के समभाग ‘टीपीजी कॅपिटल’ या अमेरिकेच्या आणि ‘फोसन’ या चीनी कंपनीला त्यांनी  विकले. तर, १० टक्के समभाग स्वत:कडे ठेवले.
 
लालिबेरटे यांचा जन्म क्युबेक शहरात १९५९ मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे पालनपोषण उत्तम पद्धतीने झाले. वडील जनसंपर्क विभागात  काम करत होते. लहानपणी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी तेथे पीटी बर्नम यांचा "द ग्रेट शो ऑन अर्थ' पाहिला. ही सर्कस त्यांना इतकी आवडली की, त्यांनी बर्नम यांचे जीवनचरित्र वाचून काढले. युवावस्थेत ही कला समजून घेण्यासाठी लालिबेरटे यांनी अवघा यूरोप पालथा घातला. ते एका नाट्यसमूहात सामील झाले. हा गट विविध शहरांत कार्यक्रम करायचा. नंतर ते  क्युबेकमध्ये परतले व एका धरण प्रकल्पात नोकरी स्वीकारली. पण त्यांच्या नशिबात सर्कस लिहून ठेवली होती.  म्हणून त्यांनी जसे काम सुरू केले, तसे कर्मचारी संपावर गेले. या पद्धतीने ते स्ट्रीट परफॉर्मर या आपल्या पसंतीच्या क्षेत्रात परतले.
 
आपल्या सिर्क डी सोले सर्कसला त्यांनी नव्या सर्कस मॉडेलचे रूप दिले. यात प्राणी किंवा भयंकर जनावरांच्या तोडी आपले डाेके देणे यासारखे खेळही नव्हते. यामध्ये होते जादूगार, कसरतपटू आणि जाेकर्स. एका पद्धतीने सर्कस आणि थिएटर यामध्ये ही लाइव्ह करमणूक होती. याचा विकास करण्याची सुरुवात त्यांनी १९७० मध्येच केली होती. पण त्यांची ही सर्कस लगेचच प्रसिद्धीस अाली नाही. ते सांगतात की, त्यावेळी आपण तरुण असल्याने अतिउत्साह होता. सरकारने मदत केली,.क्युबेक कम्युनिटी बँकेकडून कर्जही मिळाले. पण पहिले मोठे यश मिळाले ते १९८७ मध्ये जेव्हा त्यांचा हा सर्कस शो अमेरिकेत पोहाेचला.  

लॉस एंजिल्स फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा शो हिट झाला. नंतर १९९० च्या दशकात युरोपात त्यांचे अनेक शो झाले.  लालिबेरटे यांचे काम संघर्षपूर्ण होते. कारण त्यांची स्पर्धा होती हॉलीवूड, व्हिडिओ  गेम आणि  स्टेडियम रॉक यांच्याशी. त्यांच्या शो मध्ये जोरदार संगीत आणि भडक रंगाचे पोशाख असत. भव्य सेट्स, चमकदार नृत्य आणि चकित करणारे स्टंट यांचीही रेलचेल असे. १९९० चे पूर्ण दशक आणि २००० साल पूर्ण असे ते पूर्णपणे आपल्या सर्कसचा विस्तार करत राहिले. पण सध्याच्या काळात प्रेक्षकांची संख्या कमी होत आहे. हा बदल त्यांनी जाणला आणि बनाना शिंपल नावाचा शो तयार केला. पण तो यशस्वी झाला नाही.  २००९ मध्ये ३.५ कोटी डॉलर्स रक्कम अदा करून अंतराळ यात्री म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. राॅकेटमधून प्रवास करतानाही त्यांनी जोकरप्रमाणे लाल नाक लावले होते. ते अंतराळात १२ दिवस होते. अंतराळ स्थानकातून त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, वजनरहित असण्यात किती आनंद आहे ते. यासाठी मी जे पैसे खरेदी केले, ते वसूल झाल्याचे ते म्हणाले. आज त्यांच्या कंपनीत चार हजारापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. दर वर्षी दीड कोटी लोक त्यांची सर्कस पाहतात. २४ वर्षापासून ही सर्कस लोकप्रिय आहे.

- सिर्क डी सोले जगातील सर्वात मोठा लाइव्ह एंटरटेनमेंट ग्रुप आहे.
- कंपनीत ४ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.दरवर्षी दीड कोटी लोक शो पाहतात.
-  मिस्ट्री शो १९९३ म्हणजे गेल्या २४ वर्षांपासून चालू आहे.
बातम्या आणखी आहेत...