आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6000 रुपये महिना कमवणारी आज कमवतेय 25 लाख; वाचा, ती नेमकं करते काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- कधीकाळी 6 हजार रुपये महिन्याची नोकरी करणारी ही तरुणी आज 25 लाख रुपये कमवते आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरं आहे. लखनौमधील एका मिडलक्लास फॅमिलीमधील गरिमा मिश्रा स्वकर्तृत्त्वावर जोरावर हे सगळंकाही मिळवते आहे.

अशी फेमस झाली गरिमा मिश्रा...
- गरिमा एका मिडलक्लास फॅमिलीतील तरुणी आहे. फॅमिलीचे उत्पन्ना स्त्रोत तसे मर्यादीतच होते. - गरिमाचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिचे आई-वडील तिचा विवाह करण्याच्या विचारात होते.
- पण, गरिमाला विवाह करण्याआधी स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. तिने विवाहास स्पष्‍ट नकार दिला होता.
- गरिमाने सांगितले की, इंटीरियर डिझाइनर बनण्याची तिची इच्छा होती.
- पण आई-वडिलांचा त्याला विरोध होता.

'सहारा'मध्ये नोकरी करून केला इंटीरियर डिझाइनरचा कोर्स...
- गरिमाने 2007 मध्ये 'सहारा'मध्ये 6 हजार रुपये महिन्याची नोकरी केली. यादरम्यान तिने इंटीरियर डिझाइनरचा कोर्स पूर्ण केला.
- याशिवाय, फावल्या वेळात ती मार्केटिंग स्टडीजचे धडेही घेत होती.
- गरिमा दिवसा नोकरी व रात्री प्रोजेक्ट तयार करण्‍याचे काम करत होती.
- 2010 मध्ये गरिमाना नोकरीला रामराम ठोकला. एका आर्किटेक्टसोबत तिने बिझनेस सुरु केला.
- मार्केटमध्ये स्वत:ची चांगली ओळख निर्माण केली.
- हळूहळू सेव्हिंग करून तिने स्वतंत्र बिझनेस सुरु करण्याचे नियोजन केले.
- स्वत:चे ऑफिस सुरु केले. नवे क्लाइंट मिळवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले.
- क्लाइंटला भेटण्यासाठी तिला वारंवार जावे लागत होते. यासाठी तिने रेंटवर गाडी घेऊन काम सुरु केले.
- गरिमाला 2012 मध्ये पहिले काम ‍मिळाले. या कामाचे तिला 10 हजार रुपये मिळाले.
- गरिमाने सांगितले की, लखनौमध्ये इंटीरियर डिझाइनिंग करणार्‍या अनेक महिला होत्या. पण, तिला एक्झिक्‍यूट करणार्‍या तशा मोजक्याच होत्या.
- हळूहळू स्वत:ची टीम उभी केली.
- गरिमा आज साइट व्हिजिट फीसही आकारते. एका व्हिजिटचे ती 1000 रुपये घेते.
- गरिमाने स्वत:ची होंडा कार खरेदी केली आहे. ती महिन्याकाठी 25 लाख रुपये कमवते.
- तिने अनेक पोजेक्ट केले आहेत. त्यात काही सरकारी तर काही खासगी आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शुन्यातून विश्व निर्माण करणार्‍या गरिमा मिश्राचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...