आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीने दागिने विकून सुरु केला बिझनेस, आज 900 कोटींच्या कंपनीचा मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'जस्ट डायल\'चे मालक व्हीएसएस मणी - Divya Marathi
\'जस्ट डायल\'चे मालक व्हीएसएस मणी
व्ही.एस.एस मणी, जस्ट डायलचे मालक
वय- 48 वर्षे
शिक्षण- बी.कॉम. दिल्ली विद्यापीठातून
कुटुंब- आई, पत्नी अनिता (स्क्रिप्ट रायटर), दोन मुले
चर्चेचे कारण- जस्ट डायल ई-कॉमर्समध्ये सामील

व्यंकटचलम स्थनू सुब्रमणी मणी. नावावरून हे दक्षिण भारतीय असल्याची ओळख पटते. मात्र, तिथे ते कधीच राहिले नाहीत. कोलकात्यातच घडलेल्या या व्यक्तीने 1996 मध्ये मुंबईतील एका गॅरेजमधून सुरू केलेल्या कंपनीचा वटवृक्ष 900 कोटींवर नेला आहे.

पत्नीचे दागिने विकून किरायाचे फर्निचर, संगणक आणि 50 हजार रुपयांसह त्यांनी सुरुवात केली. फक्त कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या कंपनीचे आता महानायक अमिताभ बच्चन हे ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार आहेत. युनायटेड डाटाबेस इंडिया कंपनीच्या यलो पेजेसमध्ये कार्यरत असताना वयाच्या 22 व्या वर्षीपासूनच त्यांच्या डोक्यात जस्ट डायलची कल्पना होती. त्यामुळेच 1989 मध्ये त्यांनी 'आस्क मी' नावाने एक कंपनी उघडली. मात्र, जास्त कनेक्शन नसल्याने यश आले नाही. 8888888888 हा क्रमांक आता जस्ट डायलसाठी वापरला जातो. मात्र, 1996 मध्ये तो मुंबईच्या कांदिवली एक्सचेंजचा क्रमांक होता. एक्सचेंजच्या महाव्यवस्थापकांना कसेबसे समजावून सांगून त्यांनी हा क्रमांक देण्यासाठी राजी केले. मात्र, 15 हजार रुपये दिल्याने ते घेऊ शकले नव्हते. कधी एकेकाळी त्यांनी वेडिंग प्लॅनिंग कन्सल्टन्सीचेही काम केले. परंतु, काही दिवसांतच त्यास रामराम ठोकला आणि जस्ट डायलवर लक्ष केंद्रित केले. याची प्रेरणा त्यांना पत्नी अनिताकडूनच मिळाली आहे. लग्नावेळी अनितांना तंत्रज्ञानाबद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र, स्मार्टफोन घेतल्यापासून त्यांनी यात कौशल्य मिळवले. हे पाहूनच मणी यांच्या डोक्यात प्रत्येक व्यक्तीच्या कामी येणारे काम सुरू करण्याचा विचार आला. अनिता चित्रपटांसाठी लेखन करतात. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा मणीही त्यांच्यासोबत स्क्रिप्ट लेखन करतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'जस्ट डायल' कंपनीचे मालक व्ही.एस.एस मणी यांचे फोटो...