आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्सेस स्टोरी: मजूरी ते एक लाख मासिक उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सक्सेस स्टोरी (फार्महाऊसवर मजुरी करणारा झाला डेअरी फार्मचा मालक )
रायपूर - आजच्या काळात फार्महाऊसवर मजुरी करणारा तरुण मालक होऊ शकतो पण हे
स्वप्न सत्यात उतरवले आहे नक्षलप्रभावित छत्तीसगडमधील तरुणाने.

कशा घेतल्या गायी ?
दुर्बलरामने कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांच्या योजना माहित करून घेतल्या. त्याच्या विक्रमी भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने तीन वर्षांपूर्वी त्याला आत्मा योजनेंतर्गत 25 हजार रुपयांचे उत्कृष्ट शेतकरी पारितोषिक दिले. त्यासोबतच कृषी विभागाच्या योजनेंतर्गतच त्याला हरियाणा, पंजाब आणि दिल्ली येथील प्रगत शेती पाहण्याचा आणि अभ्यासण्याची संधी मिळाली यात त्याने भाजीपाला लागवडीत शेणखत उपयोगाची माहिती घेतली आणि येथूनच त्याला प्रेरणा मिळाली. त्याने त्याच्या भाजीपाला शेतीसाठी पाच जर्सी गायी खरेदी केल्या.
२५ हजारांचे उत्कृष्ट शेतकरी पारितोषिक
रायपूरच्या दुर्बलरामने कुटुंबाची पाच एकर शेती वडील पदूराम यांच्या हवाली करून पाच वर्षांपूर्वी धमतरी येथील एका फार्म हाऊसवर 150 रुपये रोजंदारीवर काम सुरू केले. आज मात्र तो डेअरी फार्मचा मालक आहे आणि एक लाख रुपयांपेक्षा जास्त त्याचे मासिक उत्पन्न आहे.
>हरियाणाहून होलिस्टाेन जातीच्या गायी : छत्तीसगडमधील ध्रुव डेअरी फार्मवर हरियाणाच्या होलिस्टोन जातीच्या 10 आणि जर्सी 20 गायी आहेत. त्यातील सध्या 26 गायी दिवसातून दोन वेळा 220 लिटर दूध देत आहेत. चार गाभण आहेत. दुभत्या गायींच्या वासरांसह 15 मोठ्या गायी सध्या फार्मवर आहेत.
>परिसरात नंबर एक भाजीपाला उत्पादक: वयोमानाने वडिलांना शेतीचे काम शक्य नसल्याने दुर्बलला घरी परत बोलवण्यात आले. फार्म हाऊसवर भाजीपाला लागवडीचा आणि त्याच्या संगोपनाचा अनुभव गाठीशी घेऊन दुर्बल घरी परतला. छोटा भाऊ अर्जुनच्या मार्गदर्शनाखाली त्याने पाच एकर शेतीमध्ये भाजीपाला लागवड सुरू केली. ठिबक (ड्रिप) पद्धती आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा फायदा घेत आज दुर्बल परिसरातील क्रमांक एकचा भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला आहे.
पशुधन पालनाकडे ओढा
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून मिळणा-या उत्पन्नामुळे हळूहळू त्याचा पशुधन पालनाकडे ओढा वाढला. दीड वर्षांपूर्वी त्याने युनियन बँकेच्या उरमाला शाखेतून पाच लाखांचे कर्ज घेऊन एक युनिट अर्थात 10 गायी खरेदी केल्या. सहा महिन्यानंतर त्याने पुन्हा युनियन बँकेकडे एक युनिट गायी खरेदीच्या कर्जासाठी अर्ज केला. या वेळी त्याने वडील पदूराम यांच्या नावे दुसरे युनिट घेतले. आज त्याच्या फार्म हाऊसमध्ये सकाळी 120 आणि सायंकाळी 100 लिटर दूध उत्पादन होत आहे. यातून त्याला महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

संकलन : उन्मेश र. खंडागळे, औरंगाबाद.