आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Success Story Of Shama Kabani, A Social Media Millionaire

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 व्या वर्षी बनली सीईओ, वेब मार्केटिंगच्या जगतात रचला इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमा हैदर कबानी वेब मार्केटिंग जगतात हे नाव चांगलेच प्रसिद्ध आहे. 2006 मध्ये ट्वीटरवर जेव्हा केवळ 2000 यूझर्स होते त्यावेळी ही विद्यार्थिनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये शिक्षणादरम्यान टि्वटरवर थिसीस तयार करत होती. सोशल मिडियाबाबत अधिक ज्ञान असल्याने सध्या वेब मार्केटिंगमध्ये तिचे नाव चांगलेच चर्चेत आहे. अत्यंत कमी काळात मोठी कामे केल्यानेही त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे शमा यांनी अवघ्या 24 व्या वर्षी कंपनीच्या सीईओ बनत इतिहास रचला होता.

कोण आहेत शमा हैदर कबानी
शमा यांचा जन्म 25 एप्रिल 1985 मध्ये गोव्यात झाला होता. 9 वर्षांपर्यंत बेंगळुरूमध्ये शिकल्यानंतर त्या आई वडीलांबरोबर अमेरिकेत स्थायिक झाल्या. भारतीय वंशाच्या शमा या 'द मार्केटिंग जेन ग्रुप' च्या संस्थापक आणि सीईओ आहेत. 'शमा हैदर कबानी' यांनी सर्वात कमी वयात पुस्तक लिहिण्याचा इतिहासही रचला आहे. त्यांनी 24 व्या वर्षी वेब मार्केटिंग वर 'द जेन ऑफ सोशल मीडिया मार्केटिंग' नावाने एक पुस्तक लिहिले होते. 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने अमेझॉन डॉट कॉमवर सर्वाधिक विक्री होणारे तिसऱ्या क्रमांकाचे पुस्तक असल्याचा विक्रमही रचला.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 'शमा कबानी' यांची यशोगाथा...