आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा आैषधनिर्मिती उद्योग केला 13 हजार भव्य दालनांत परिवर्तित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दशकांपूर्वी इटलीच्या नेपल्स शहरात आपल्या कुटुंबाच्या ठोक आैषधविक्री व्यवसायाची सूत्रे स्टेफनो पेसिना यांनी स्वीकारली. आज ते जगातील सर्वात मोठ्या आैषधविक्री दालनाच्या शृंखलेचे मालक आहेत. वालग्रीन्स बूट्स अलायन्स नामक ही शंृखला त्यांनी विकसित केली. संपूर्ण युरोपात १५० प्रतिस्पर्धक आैषध कंपन्यांचे अधिग्रहण केले. नंतर आपल्या युनिकॅम समूहाचे  विलीनीकरन त्यांनी अलाइन्स बूट्समध्ये केले. यासाठी त्यांनी २२ अब्ज डॉलर्सचा करार केला. ऑक्टोबर २०१५ मध्ये वालग्रीन्स बूट्स अलायन्सने आपले औषध विक्री दालन रायव्हल राइडमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला. १७ अब्ज डॉलर्सचा हा प्रस्ताव होता. याच्या दोन महिन्यांनंतर स्टेफनो पेसिना कंपनीचे सीईओ झाले. अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे. या कंपनीचा विस्तार युरोप आणि अमेरिकेशिवाय ११ देशांमध्ये झाला आहे. कंपनीत ४ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत.  
 
१९४१ मध्ये स्टेफनो यांचा जन्म झाला. ते इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. १३.२ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे बालपण मिलान, कोमो आणि नेपल्स येथे गेले. वडील वायुदल अधिकारी होते. मिलानच्या पॉलिटेक्निक विद्यापीठात त्यांनी न्यूक्लिअर फिजिक्सचे पदवी शिक्षण घेतले होते. त्यांना न्यूक्लिअर अभियंता होण्याची इच्छा होती. शिक्षणात खंड पडल्याने त्यांनी एसी नील्सन नामक कंपनीत नोकरी मिळवली. काही काळानंतर नील्सन यांनी त्यांना शिकागोला जाण्याचा प्रस्ताव दिला. स्टेफनो यांनी नकार दिला. त्यांनी म्हटले की मला जे शिकायचे होते ते मी शिकलो आहे. यादरम्यान १९७४ मध्ये त्यांच्या वडिलांनी म्हटले की, कुटुंबाच्या औषध वितरण कंपनीकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्टेफनो यांना दोन गोष्टींचे महत्त्व पटले होते. एक- संवाद तंत्राचा वापर उत्पादन वितरणासाठी करणे. दुसरे- १९७० मध्ये अनेक कंपन्या दिवाळखोरीत होत्या.  त्यांची खरेदी करणे. आपल्या कंपनीच्या लाभांशात त्यांनी इतर कंपन्यांचे अधिग्रहण केले.
 
यादरम्यान ते आेरनीला बारा यांच्या संपर्कात आले. बाराने आपली औषध वितरण कंपनी पेसिना यांना १९८६ मध्ये विकली होती. त्या या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून सामील झाल्या. तेव्हा त्यांच्या कंपनीचे नाव होते एलिआंज्रा सॅल्यूट आणि या कंपनीला इटलीचा बाजारही अपुरा वाटत होता. १९९१ मध्ये पेसिनाने आणखी एक समूह स्थापन केला. याचे नाव फ्रेंच समूह होते. युरोपच्या बाहेरील कंपन्यांचे अधिग्रहण सुरू केले. यानंतर त्यांनी लक्झेम्बर्ग येथील अलायन्स सँटे कंपनी स्थापन केली. आपले व्यावसायिक यश आणि सतत नवे प्रयोग करण्याच्या प्रेरणेविषयी ते सांगतात की, बिझनेसचा विस्तार करण्याची मनस्वी इच्छा कमी झाली नाही. कुटुंबाचा व्यवसाय हाती घेतानाही उत्साह होता. माझ्या समूहाला जगातील सर्वात मोठा औषध वितरण आणि हेल्थ ब्युटी समूह बनवण्याची इच्छा होती.  
 
विकास करायचा असेल तर  स्वत:मध्ये बदल करावे लागतात. नकारात्मक, सकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेणे क्रमप्राप्त आहे. दूरगामी ध्येय निश्चित करून घ्यावे लागतात. नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी दृष्टिकोन, एकाग्रता, आंतरिक ऊर्मी, हिंमत आणि आवड यांची गरज आहे. समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय योजण्याची गरज आहे. नेहमी बाजारात नवे उत्पादन आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. जोखीम पत्करणे अनिवार्य आहे.

- जगातील सर्वात मोठ्या आैषधविक्री दालनांच्या शृंखलेत ४ लाखपेक्षा अधिक कर्मचारी  
-  वडील ठोक आैषध विक्रेता होते.  
-  स्पर्धेतील १५० आैषध कंपन्यांचे अधिग्रहण केले.  
 
बातम्या आणखी आहेत...