आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नापास विद्यार्थ्याने \'हॅकिंग\'मध्ये घडवले करियर, 21व्या वर्षी बनला CEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- तुमच्यात काही करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. असेच काहीसे पंजाबमधील लुधियाना येथील मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आलेल्या त्रिशनित अरोराच्या बाबतीत घडले. बालपणी त्याची गणती 'ढ' विद्यार्थ्यांमध्ये केली जात होती. आज तो 21 व्या वर्षी एका नामांकित कंपनीचा सीईओ झाला आहे. CBI देखील त्याच्याकडून मदत घेते, इतके कौशल्य त्रिशनितकडे आहे.

अभ्यासात नेहमी सगळ्यांच्या मागे असलेला त्रिशनित कॉम्प्यूटरमध्ये हूशार होता. तो जास्तीत जास्त वेळ कॉम्प्यूटरवरच घालवत होता. यामुळे त्याचे इतर विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे तो सांगतो. आठव्या इयत्तेत असताना त्याला कॉम्प्यूटर व एथिकल हँकिंगमध्ये रुची निर्माण झाली.

CBI ते रिलायन्स इंडस्ट्री आहे त्रिशनितचे क्लाइंट...
- कॉम्प्यूटरच्या नादात त्रिशनित इतका मग्न झाला की, त्याने अर्ध्यात शिक्षण सोडले. परीक्षा दिली नाही. परिणामी तो नापास झाला.
- त्याला आई-वडिलांचे बोलणे ऐकावे लागले. मित्रांनीही टिंगल केली. मात्र, त्रिशनित थोडाही डगमगला नाही.
- आठवीत नापास झाल्यानंतर त्याने बाहेरुन बारावीची परीक्षा दिली. पास झाला.
- सोबतच त्यांनी कॉम्प्यूटर व हँकिंगविषयी नवनवीन माहिती मिळवली.
- त्रिशनित जे काही करत होता, त्यावर त्याचे आई-वडील मात्र असमाधानी होते.
- त्रिशनित काही क्षणातच एखाद्या कंपनीचा डेटा मिळवत होता. मात्र, त्याचा त्यात फसवणूक करण्याचा कोणताही उद्देश नव्हता.
- हळू-हळू त्याच्या कामाला सामाजिक मान्यता मिळाली. उद्योग जगतात त्याच्या कामाचे कौतुक व्हायला लागले.

21 व्या वर्षी सुरु केली स्वत:ची कंपनी, बनला सीईओ...
- 21 व्या वयात त्रिशनितला टीएसी सिक्युरिटी नामक सायबर सिक्युरिटी कंपनी स्थापन केली.
- त्रिशनितची कंपनी रिलायन्स, सीबीआय, पंजाब पोलिस, गुजरात पोलिस, अमूल व एवन सायकल सारख्या कंपनीशी सायबरशी संबंधित सर्व्हिस देतो.
- त्रिशनितला ‘हॅकिंग टॉक विद त्रिशनित अरोरा’ ‘द हॅकिंग एरा’ व ‘हॅकिंग विद स्मार्ट फोन्स’ सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्‍यात आले आहे.
- 2013 मध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कृत करण्‍यात आले.
- 2014 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी स्वातंत्र दिनी ‘स्टेट अवाॅर्ड ’ने सन्मानित केले होते.
- 2015 मध्ये त्रिशनितला पंजाबी आयकॉन अवाॅर्ड प्रदान करण्‍यात आला.

‘पॅशन’ पुढे शिक्षण महत्त्वाचे नाही...
- त्रिशनितने सांगितले की, तुमच्या पॅशनपुढे शिक्षण महत्त्वाचे नाही.
- बाहेरून 12 वी पास झालेला त्रिशनितला भविष्यात मॅनेजमेंटमध्ये पदवी घ्यायची आहे.
- अपयशाची पुढील पायरी यश आहे. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. पॅशनवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्रिशनितने दिला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, नापास झाल्यानंतर 'हॅकिंग'मध्ये करियर घडवून 21व्या वर्षी CEO बनलेल्या त्रिशनित अरोराचे निवडक फोटो...