आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भजी विकली, पेट्रोल पंपावर काम केले; धीरुभाई असे बनले होते \'पॉलिस्टर किंग\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा आज (6 जुलै) स्मृती दिन आहे. धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापन केला. 1977 साली सार्वजनिक घोषित केलेल्या रिलायन्स कंपनीचा देशासह विदेशात विस्तार झाला आहे.

धीरुभाईंचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य.

धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. 1949 मध्ये आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए.बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक 300 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी केली. ही कंपनी छोट्या मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तिथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी, असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली आणि आज त्यांची स्वत:ची सगळ्यात मोठी खासगी रिफायनरी आहे. धीरुभाईंच्या जीवनावर 'गुरु' हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, भजी विक्री हा धीरुभाई अंबानींचा पहिला व्यवसाय...