आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही अंबानी फॅमिली, मोलमजुरीने झाली होती सुरूवात, आज देशात सर्वात श्रीमंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबांनी यांचे वडील व धीरुभाई अंबानी यांचा आज, 6 जुलैला स्मृतीदिन आहे. धीरुभाई यांच्या स्मृतीदिनानिर्मित आम्ही आपल्यासाठी अंबानी कुटुंबाशी संबंधित माहिती घेऊन आलो आहे.

अंबानी कुटुंबातील काही मोजक्याच सदस्य मीडियासमोर येतात. मात्र, अंबानी कुटुंबातील इतर सदस्य कोण? त्यांचा व्यवसाय काय? या संदर्भात आज आम्ही आपल्यासाठी धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबाशी संबंधित काही रोचक किस्से घेवून आलो आहे.

धीरूभाई अंबानी व कोकिळाबेन यांना मुकेश, अनिल, नीना व दीप्ती अशी चार मुले आहेत.

धीरूभाई अंबानी व कोकिळा बेन:
धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 ला सौराष्ट्रातील जूनागड जिल्ह्यात झाला. धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली. 1977 मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून 2007 साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता 60 अब्ज डॉलर होती.
धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती. तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. 6 जुलै 2002 रोजी धीरूभाई यांचे निधन झाले. त्यांनी त्यांची मालमत्तेचा वाटणी करताना त्यांची पत्नी कोकिलाबेन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

यमनमध्ये रिफायनरीत केली मोलमजुरी...
शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले. यमनहून मायदेशी परतल्यानंतर धीरुभाई यांनी चुलतभाऊ चंपकलाल दिमानी यांच्या मदतीने रिलायन्स कमर्शियल कॉरर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून धीरूभाई यांनी सुरुवातीला पश्चिमात्य देशात आलं (अदरक), हळद व इतर मसाल्यांची निर्यात केली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अंबानी कुटुंबातील अनोळखी चेहर्‍यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...