आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार, किमती मात्र स्थिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात एक डिसेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार असून या वर्षी साखर उत्पादनात तब्बल ४० टक्के घट होणार आहे. मात्र, साखरेचे उत्पादन घटणार असले तरी किमती मात्र स्थिर राहणार आहेत. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी ही माहिती दिली. साखर संघात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नव्या हंगामात ४८५ लाख मॅट्रिक टन उसाचे उत्पादन होईल. त्यातून ५० लाख टन साखरेची निर्मिती अपेक्षित असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी आहे. असे असले तरी साखरेच्या किमतीवर काही एक परिणाम होणार नसल्याचा दावा नागवडे यांनी केला आहे.

सध्या ३३ लाख मॅट्रिक टन साखर अतिरिक्त शिल्लक आहे. त्यामुळेच साखरेचे उत्पादन जरी घटले तरी किमती स्थिर राहणार आहेत. नव्या हंगामात जवळपास १५० कारखाने गाळप करणार आहेत. मात्र, नवा हंगाम सुरू होताना राज्य सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करावी. महाराष्ट्राआधी कर्नाटकने गाळप हंगाम सुरू केला तर त्याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो, असेही नागवडे यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक सरकारने गाळप हंगाम आधीच सुरू केला, तर सीमा भागातील कारखान्यांना त्याच कालावधीत गाळप करण्यास परवानगी द्यावी. दरम्यान, खरेदी कर माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे साखर संघाने स्वागत केले आहे.
बातम्या आणखी आहेत...