आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचे भाव उतरल्यामुळे ऊस लागवड ३ % घटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस लागवडीचा कल कमी झाला आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १५ जुलैपर्यंत देशातील ४४.८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २.८ टक्के कमी आहे. गेल्या वर्षी ४६.१ लाख हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. खरीप पीक घेणाऱ्या जमिनीचे क्षेत्र ४८.४ लाख हेक्टर आहे. वास्तविक साखरेचे भाव कमी होत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २१,००० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे असे शेतकरी उसाव्यतिरिक्त इतर पिके घेण्याकडे वळले आहेत.

सहा वर्षांत सर्वात कमी साखरेचे भाव
साखरेच्या किमती कमी होण्याचे संकट आणखी वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर साखरेची किंमत आहे. देशातही साखर २२०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली विक्री होत आहे. गेल्या दोन दिवसांत साखर ७० रुपयांनी स्वस्त झाली आहे. तसेच या वर्षीदेखील साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात २३ टक्के क्षेत्र घटले
देशात सर्वात जास्त उसाचे उत्पादन हे उत्तर प्रदेशात घेतले जाते. येथे उसाची लागवड ०.९० टक्क्यांनी वाढून १९.६ लाख हेक्टर झाली आहे, तर महाराष्ट्रात या वर्षी २२.७ टक्के उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात ८.२१ लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड झाली आहे. असे असले तरी कर्नाटकमध्ये २३.८, तर तामिळनाडूमध्ये १७.१ टक्के लागवडक्षेत्र वाढले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ऊस लागवडीखालील क्षेत्र.
बातम्या आणखी आहेत...