आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस लागवड क्षेत्र ५.५ टक्क्यांनी घटले, साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - २०१६-१७ च्या साखर हंगामात देशातील ऊस लागवड क्षेत्र ४९.९१ लाख हेक्टर राहण्याची शक्यता सॅटेलाइटवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार व्यक्त करण्यात आली आहे. २०१४-१५ साखर हंगामातील ५२.८४ लाख हेक्टरच्या तुलनेत हा आकडा ५.५ टक्क्यांनी कमी आहे. वास्तविक यादरम्यान सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील ऊस लागवड क्षेत्र वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात चालू हंगामात लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. या वेळी उत्तर प्रदेशमध्ये २३.३५ लाख हेक्टरवर उसाची लागवड होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात २३.०२ लाख हेक्टरवर उसाची लागवड करण्यात झाली होती. चांगल्या उत्पादनाची तसेच भाव मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे उत्तर प्रदेशात २०१६-१७ साखर हंगामात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

साखर उत्पादनात घट
२०१६-१७ मध्ये देशातील साखर उत्पादनात घट हऊन २३२.६ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज इस्माने व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी २०१५-१६ मध्ये देशात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. एक ऑक्टोबरला देशातील शिल्लक साखर ७१ लाख टन असेल. यामुळे देशातील साखरेची एकूण उपलब्धता ३०३.६ लाख टन असेल, यातील भारतात दरवर्षीप्रमाणे २६० लाख टन साखरेची मागणी सहज पूर्ण होऊ शकते.

महाराष्ट्रात लागवड क्षेत्र घटले
२०१६-१७ साखर हंगामात महाराष्ट्रातील ऊस लागवड क्षेत्र ७.८० लाख हेक्टर राहण्याचा अंदाज आहे, तर २०१५-१६ मध्ये १०.५ लाख हेक्टर लागवड क्षेत्र होते. महाराष्ट्रात सिंचनाची योग्य व्यवस्था नसल्याने तसेच कमी पावसामुळे राज्यातील ऊस लागवड क्षेत्रात घट झाली असल्याची माहिती इस्माने दिली आहे. २०१६-१७ च्या साखर हंगामात महाराष्ट्रात ६१.५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, तर त्या आधीच्या वर्षी महाराष्ट्रात ८४.०८ लाख टन साखरेेचे उत्पादन झाले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...