आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरकिंग एअर बी विमान पुन्हा उड्डाण घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या शासकीय दौऱ्यासाठी भाड्याने घ्याव्या लागणाऱ्या हेलिकॉप्टर आणि विमानाच्या भाड्यात बचत होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडील सुपर किंग एअर बी ३०० (३५०)(व्हीटी-एमजीजे) या विमानाची दुरुस्ती करून त्याच्या पुनर्वापरास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या शासकीय दौऱ्यासाठी १९९८ मध्ये सुपर किंग एअर बी ३०० (३५०)(व्हीटी-एमजीजे) हे विमान अमेरिकेच्या बिचक्राफ्ट कंपनीकडून राज्य शासनाने १७.२४ कोटी रुपयांना विकत घेतले. आसन क्षमता अधिक एवढी असणाऱ्या या विमानाने अकरा वर्षे अविरत सेवा दिली. त्यानंतर राज्य शासनाने सेसना सायटेशन ५६० हे विमान खरेदी केल्यापासून सुपर किंग विमानाचा वापर कमी झाला तसेच केंद्र शासनाच्या नागरी विमानाने प्राधिरणाच्या सूचनेनुसार रडारसह आवश्यक असलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक अत्याधुनिक उपकरणे विमानात बसविली नसल्याने जुलै २०११ पासून ते वापराविना भूमिस्त आहे.

यादरम्यान विमानाच्या विक्रीचाही प्रयत्न राज्य शासनाने केला होता. परंतु अपेक्षित मूल्य आल्याने पुढील कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या विमानाच्या वापराबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

विमान अद्ययावत करून त्याचा पुनर्वापर केल्यास ते राज्यासाठी फायदेशीर ठरेल असा अहवाल मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाने जुने विमान पुनर्वापर करण्यास आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...