पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील 100 शहरे स्मार्ट सिटी बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परदेशी गुंतवणूकही या शहरांना आकर्षित करीत आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आली असली तरी राहणीमानाच्या बाबतीत भारत खूपच मागासलेला आहे. भारतात मागील काही वर्षात शहरांतील पायाभूत सुविधात वाढ केल्याचे दिसून येत आहे. आरोग्य, शिक्षण, सेनिटेशन आणि पायाभूत सुविधात मोठी सुधारणा झाली आहे.
आम्ही आज
आपल्या या पॅकेजमधून भारतातील पाच शहरांबाबत माहिती सांगणार आहोत. ही शहरे लक्झरी लाईफ आणि राहणीण्यासाठी सर्वोत्तम मानली जातात. जनाग्रह सेंटर फॉर सिटीजनशिप अँड डेमोक्रेसीने आपल्या वार्षिक अहवालाच्या आधारे या शहराची यादी तयार केली आहे.
1) सुरत (गुजरात)
डायमंड कॅपिटल म्हणून सुरतचे नाव जगाच्या कान्याकोपर्यात पोहोचले आहे. सुरत हे व्यावसायिक शहर असून येथे हजारो लोक व्यवसाय करतात. सुरत जगात सर्वाधिक वेगाने वाढणार्या शहरांपैकी एक आहे. भारतातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर सुरतचा देशात पहिल्या क्रमांक लागतो. यासाठीच सुरतला स्वच्छ शहरासाठी 1995-1996 मध्ये इंटक अवॉर्ड मिळाला होता तर 2011 मध्ये याच अवॉर्डमध्ये तिसरे स्थान मिळवले. जनाग्रह सेंटर फॉर सिटीजनशिप अँड डेमोक्रेसीने यंदाच्या आपल्या वार्षिक सर्वेत सुरत भारतातील सर्वात चांगले शहर असल्याचे सांगत पहिले स्थान दिले आहे.