आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक तुम्हाला फायनान्स प्रॉडक्ट विकत नाही ना?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बँकेवर आपला पूर्ण विश्वास आहे. बँकांना खातेदारांची शिल्लक, मुदत ठेवी इत्यादीची सगळी माहिती असते. काही वेळा बँक आपल्या मोठ्या ग्राहकांना चुकीचे प्रॉडक्ट गळ्यात मारते. त्यामुळे त्यांनाही याचा त्रास होतो. ज्येष्ठ नागरिक जेव्हा पैसे कोठे गुंतवू? कोणते प्रॉडक्ट किती सुरक्षित आहेत? अशी विचारणा करतात, त्यांना फारशी माहितीही नसते तेव्हा अशा ग्राहकांना बँक आपले सावज ठरवते. बँक अधिकाऱ्यांवर वरच्या अधिकाऱ्यांचा दबाव असतो. त्यामुळे हे अधिकारी त्यांचे प्रॉडक्ट ग्राहकांच्या माथी मारतात. मग सोने तारण ठेवून कर्ज घेणारा ग्राहक असो की पर्सनल लोन घेणारा अथवा निवृत्त कर्मचारी असो, या बँकांनी कोणालाही सोडले नाही. एकदा प्रॉडक्ट विकल्यानंतर ग्राहकांचे पुढे काय होईल? ग्राहकांस कोणताही सल्ला देत नाहीत, की त्यांची चिंताही करत नाहीत. तसे तर बँक थर्ड पार्टी प्रॉडक्टमुळे मूळ बँकिंग सेवा विसरून गेली आहे. हेच बँकांचा एनपीए वाढण्याचे कारण आहे.

आर्थिक सल्लागार या नात्याने बँकांत काही कर्मचारी असतात. त्यांना वेतन बँकेतून मिळते. ते नेहमी बँकेच्या हिताचे काम करतात. कारण त्यांना कमिशनही जास्त मिळते. जर तुमच्या बँकेचा व्यवस्थापक तुम्हाला योग्य सल्ला देत नाही, असे वाटले तर त्याला काही प्रश्न जरूर विचारा.

गुंतवणूकदारांची गरज पूर्ण करण्यासाठी चांगला अार्थिक सल्लागार ग्राहकांची उद्दिष्टे जाणून घेतो. गुंतवणूकदारास कोठे जोखीम असू शकते, ते तो पाहतो. जर या बाबतीत तो काही सांगत नसेल तर गुंतवणूकदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये.
बँकात आर्थिक सल्लागार खूप चांगले असतात, असे सर्वसामान्य लोकांना वाटत असते. किंवा एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळत असल्याने असे प्राॅडक्ट विकत घेणे सोपे जाते. गुंतवणूकदारांनी या प्रॉडक्टमुळे आपली गरज पूर्ण होते आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. जर तुम्ही आर्थिक सल्लागाराशी संपर्क करत असाल तर सर्व पर्यायांवर विचार कराल. केवळ एकच प्रॉडक्ट पाहणार नाही. गुंतवणूकदारांनी प्रॉडक्ट आणि त्यावरील नफ्याचा सरळ सोपा विचार करावा.

बँक तुमची हितचिंतक आहे, हा विचार डोक्यातून काढून टाका. या बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. तुमच्या पैशाचा परतावा िकती मिळतो आहे, याचा विचार करा. तेथे तुमचे खाते असले तरी किंवा तेथील कर्मचारी तुम्हाला सर्व प्रकारची मदत करत असले तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार असे निदर्शनास आले की, ७६.३ टक्के बँकरांना वाटते की, त्यांच्यावर प्रॉडक्ट विकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खूप दबाव असतो. बँक कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळतो म्हणून प्रॉडक्टसंदर्भात चुकीची माहिती देतात, असे ६७ टक्के ग्राहकांना वाटते.

रिझर्व्ह बँकेने अलीकडेच बँकांद्वारे थर्ड पार्टी प्रॉडक्ट विकण्यावर नियंत्रण आणले आहे. बँकेचे म्युच्युअल फंड आणि विमा योजना विकणाऱ्या बँकांच्या नियमांत रिझर्व्ह बँकेने चांगले बदल केले आहेत. बँक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी सेवा त्यांच्या शाखेत देऊ शकत नाही. त्यासाठी वेगळे कार्यालय उघडावे लागेल. चुकीच्या पद्धतीने प्रॉडक्ट विकल्याची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. विमा योजना आणि म्युच्युअल फंडाच्या प्रॉडक्टवर बँक कर्मचाऱ्यांना खूप भारी इन्सेंटिव्ह मिळाले असल्याचे निदर्शनास आले आहे. रिझर्व्ह बँकेने आता सेबीमध्ये इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर मानकानुसार नोंदणीकृत व्हावे लागणार आहे. हे चांगले पाऊल रिझर्व्ह बँकेने उचलले आहे. परंतु याची अंमलबजावणी कशी होईल यावर शंकाच आहे. तीन वर्षांत या मानकांचे पालन झालेच पाहिजे, अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिली आहे.

सुरेश नरुला
फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड आॅफ इंडियाचे सदस्य
बातम्या आणखी आहेत...