आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Prabhu Seeks Rs 32,000 Crore Grant To Implement Salary Hikes For Railway Employees

पगारवाढ : रेल्वेमंत्र्यांनी मागितली अर्थमंत्री अरुण जेटलींकडे मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगार देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे मदत मागितली आहे. संबंधितांनी एक पत्र पाठवून रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत ३२ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. रेल्वेकडे असलेल्या उत्पन्नाच्या स्रोताच्या माध्यमातून पुढील तीन ते चार वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारे उत्पन्न मिळवेल, असा विश्वासही प्रभू यांनी व्यक्त केला.
यासाठी हळूहळू भाडे वाढवणे तसेच इतर उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे मालगाडीचे भाडे वाढवण्याचा विचार करत नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे रेल्वेवर २८,४५० कोटी रुपयांचे ओझे वाढणार अाहे. या व्यतिरिक्त प्रमोशन आणि इन्क्रीमेंटच्या स्वरुपात वाढणारी पगारवाढ वेगळीच आहे. त्यासाठी १०,८१६ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीमुळे ३०,०३१ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.