आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सप्टेंबर २०१९ पासून मिळेल स्विस बँकेतील काळ्या पैशाची सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशात लपवण्यात आलेल्या काळ्या पैशाच्या विरोधात भारताने एक मोठे यश मिळवले आहे. भारत आणि स्वित्झर्लंडच्या दरम्यान सूचनांची देवाण-घेवाण करण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. दोन्ही देशांनी मंगळवारी
यासंबंधी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे.

या करारानुसार भारत व स्वित्झर्लंड सप्टेंबर २०१८ पासून जागतिक नियमांनुसार बँकिंग आकडे जमा करायला सुरुवात करतील, तर सप्टेंबर २०१९ पासून दोन्ही देशांमध्ये सूचनांची देवाण-घेवाण सुरू होईल. हे घोषणापत्र म्हणजे काळ्या पैशाविरोधातील मोठे यश असल्याचे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...