Home »Business »Business Special» Tata, Adanis Desire To Buy Saharas Property

सहारांची संपत्ती खरेदीची टाटा, अदानींची इच्छा; एकूण 30 मालमत्तांचा होणार लिलाव

वृत्तसंस्था | Apr 20, 2017, 03:00 AM IST

  • सहारांची संपत्ती खरेदीची टाटा, अदानींची इच्छा; एकूण 30 मालमत्तांचा होणार लिलाव
नवी दिल्ली - गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा समूहाच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या मालत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या मालमत्ता खरेदी करण्यासाठी टाटा, गोदरेज आणि अडाणी यांसारख्या मोठ्या व्यावसायिक समूहासह ओमेक्स आणि अॅल्डेको सारख्या रिअॅल्टी डेव्हलपर, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल आणि पतंजलीनेदेखील इच्छा व्यक्त केली आहे.
सध्या सहारा समूहाच्या ३० मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या मालमत्तांची किमत ७,४०० कोटी रुपये धरण्यात अाली आहे. यातील अनेक मालमत्तांच्या लिलावांसाठी सहाराने रिअल इस्टेट कन्सल्टन्सी संस्था नाइट फ्रँक इंडियाची नियुक्ती केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाइट फ्रँकला १३ एप्रिलपर्यंत लिलाव पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सर्व संभावित खरेदीदार दोन ते तीन महिन्यांची मुदत मागत आहेत. जास्त किंमत असणाऱ्या मालमत्तांच्या लिलावामध्ये ही सामान्य बाब आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे सहारा समूहाला या मालमत्ता लवकर विकाव्या लागणार अाहेत. या संबंधी संपर्क केल्यानंतर सहारा समूहाच्या प्रवक्त्यांनी खरेदी करणाऱ्यांची नावे सांगण्यास नकार दिला. प्रक्रिया सुरू असून ती लवकरात लवकर संपणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संबंधीची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाइट फ्रँकने दिलेल्या माहितीनुसार या मालमत्ता खरेदी करण्यासाठी आतापर्यंत २५० पेक्षा जास्त व्यक्ती, समूहांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Next Article

Recommended