आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा समूह म्हणजे कुणाची जहागिरी नाही : मिस्त्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | टाटा समूह ही कुणाचीही जहागिरी नसून ही कोणताही एक व्यक्ती किंवा संचालक मंडळाची संपत्ती नाही. हा समूह टाटा सन्सच्या संचालकांचा किंवा सहकंपन्यांच्या संचालकांचाही नाही.
हे सर्व स्टेकहोल्डरांचे असून यामध्ये आपल्या सर्वांचा समावेश असल्याचे कंपनीचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या सहा कंपन्यांच्या शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
याच्या उत्तरात टाटा सन्सनेदेखील अध्यक्ष बनल्यानंतर मिस्त्री यांनीच समूहाला वैयक्तिक जहागिरी बनवली होती असे म्हटले आहे. सर्वच संचालक जमशेदजी टाटा, त्यांचा मुलगा आणि इतर संस्थापकांच्या मृत्युपत्रानुसार काम करत आहेत.
मात्र, मिस्त्री यांच्या अशा वक्तव्यांमुळे समूहातील शेअरधारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...