आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा ग्रुपने सांगितले : सायरस मिस्त्रींचे आरोप बिनबुडाचे, ईमेल सार्वजनिक करणे दुःखद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : टाटा ग्रुपने सायरस मिस्त्रींच्या आरोपांना बिनबुडाचे सांगून ग्रुप याचे योग्य उत्तर देईल असे स्पष्ट केले आहे. टाटाने सांगितले आहे की, मिस्त्रींनी अनेक मुद्यांवर बोर्डाचा विश्वास गमावला आहे आणि तू-तू, मैं-मैं ग्रुप तत्त्वाच्या विरोधात आहे. ग्रुपने सांगितले की, बोर्ड डायरेक्टर्सने व्यवसायावर चिंता व्यक्त केली होती. मिस्त्रींचे आरोप तथ्यांवर आधारित नसून ईमेल सार्वजनिक करणे दुःखद आहे.
मिस्त्रींना होती सर्व निर्णयांची माहिती...
- टाटा ग्रुपने मिस्त्रींच्या आरोपावर सांगितले आहे की- 'मिस्त्रींकडे ग्रुप लीड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. त्यांनी पदावरून काढल्यानंतर आरोप लावला की, त्यांना 'नावापुरतेच चेअरमन' बनवून ठेवले होते. बोर्ड मिटींगपूर्वीच मिस्त्रींना राजीनामा देण्यास सांगितले होते. सर्व निर्णयांची माहिती मिस्त्रींना होती.
- मिस्त्रींना पायउतार करण्यापूर्वी नियमाप्रमाणे बोर्ड मतदान झाले. बहुतांश मेंबर्सनी मिस्त्रींच्या विरोधात मत दिले. यामध्ये टाटा सन्सचे ट्रस्टीसुद्धा होते. मिस्त्री यांनी कर्मचाऱ्यांच्या नजरेत टाटांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला. हे माफ केले जाऊ शकत नाही.
- मिस्त्रींनी त्यांच्या कार्यकाळात अनेकवेळा ग्रुप ट्रेडीशन तोडले. हे टाटा ग्रुपच्या तत्त्वांंच्या विरोधात आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री 2006 पासून कंपनीच्या बोर्डमध्ये होते. 2011 मध्ये त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2012 मध्ये त्यांना टाटा सन्सचे चेअरमन बनवण्यात आले.
- मिस्त्रींना टाटा ग्रुपचे कल्‍चर, इथिक्‍स, गवर्नेंस स्‍ट्रक्‍चर, फायनाशिंयल गोष्टी पूर्णपणे माहिती होत्या. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
पुढील स्लाईड्सवर वाचा, सायरस मिस्त्रींनी केलेला ईमेल...
बातम्या आणखी आहेत...