आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बे हाऊसमध्ये पुन्हा टाटा युगाला सुरुवात, समूहाची धुरा आजपासून चंद्रा यांच्या खांद्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टाटा समूहाच्या ९२ वर्षे जुने मुख्यालय  बॉम्बे हाऊसला मंगळवारी सुमारे चार महिन्यानंतर नवा कायमस्वरूपी बॉस मिळेल. टाटा सन्सची धुरा सांभाळणाऱ्या एन. चंद्रशेखरन १४९ वर्षे जुन्या टाटा समूहाचे पहिले बिगर पारसी अध्यक्ष आहेत. 
 
या चार मजली इमारतीत सात लाख कोटी रुपयांच्या टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे निर्णय होतात. १९८० च्या दशकात अध्यक्ष जेआरडी टाटा आणि त्यांच्यानंतर रतन टाटा यांच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे  या इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील कोपऱ्यातील अध्यक्षांचा कक्ष होता त्याचप्रमाणे या कक्षाला पुन्हा  सजवण्यात आले आहे. रतन टाटा यांनी २०१२ मध्ये कंपनीची धुरा सायरस मिस्त्री यांच्याकडे दिली होती. 
 
त्यानंतर मिस्त्री यांनी या कक्षाचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला होता.  त्याचबरोबर कार्यकारी संचालक मंडळातील सदस्यांची बसण्याची व्यवस्थादेखील याच कक्षात करण्यात आली होती. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून २४ ऑक्टोबर २०१६ रोजी मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. त्या वेळी मिस्त्री यांनी घेतलेले निर्णय टाटा सन्सच्या परंपरेशी जुळत नसल्याचा आरोप रतन टाटा यांच्या समर्थकांनी केला होता. 
 
पुण्यात प्रतिकृती 
रतन टाटा यांनी १९९१ मध्ये या कार्यालयात कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्षे या कार्यालयात कोणताच बदल करण्यात अालेला नाही. काही वर्षांनी कार्यालयातील फर्निचर, जेआरडी टाटा यांचा टेबल, खुर्ची आणि स्टेशनरीला पुण्याला पाठवण्यात आले. पुण्यात टाटा सेंट्रल अर्काइव्ह इमारतीमध्ये जेआरडी यांच्या कार्यालयाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. 
 
चंद्रशेखरन यांचे प्रसिद्ध नाव 'चंद्रा'
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार चंद्रशेखरन यांचे गाजलेले नाव 'चंद्रा' असे आहे. 54 वर्षांचे चंद्रा टाटा समुहाच्या 149 वर्षांच्या इतिहासातील पहिले बिगर पारसी चेअरमन असतील. 
- भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर एक्सपोर्टर TCS ला शिखरापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय चंद्रा यांना आहे. 
- चंद्रा यांच्याकडे टाटा सन्सच्या नवीन चेअरमनचा चार्ज असेल, जी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची प्रमोटर फर्म आहे. 

'अ व्हेरी बिग जॉब'
- गेल्या आठवड्यात चंद्रशेखरन यांनी त्यांच्या नव्या असाइनमेंटला 'अ व्हेरी बिग जॉब' म्हटले होते. 
- त्यांनी हा एक मोठा कॅनव्हास असून संधी आणि आव्हाने अशा दोन्हींचा मेळ असल्याचे म्हटले होते. 
- चंद्रा म्हणाले होते, मला आशा आहे की, मी काहीतरी वेगळे करू शकेल आणि प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरेल. 

अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा होईल सामना 
- असे म्हटले जात आहे की, मंगळवारी जेव्हा चंद्रा 103 अब्ज डॉलरच्या या समुहाची जबाबदारी स्वीकारतील तर अनेक महत्त्वाचे मुद्दे लगेचच आ वासून उभे असतील. 
- त्यात पहिला मुद्दा म्हणजे, टाटा स्टीलचे युरोपातील आणि विशेषतः इंग्लंडमधील ऑपरेशन हा आहे. Corus च्या अपयशी अधिग्रहणानंतर (unsuccessful acquisition) ग्रुप त्याठिकाणाहून मागे हटण्याच्या प्रयत्नात आहे. 
- टाटा स्टीलने आधीच यूकेमदील मालमत्ता विक्री करण्यास सुरुवात केली आहे. चंद्रा यांना हे ठरवावे लागणार आहे की, विशेषतः Brexit मुळे किती मालमत्ता ब्लॉक करायची आणि किती मागे हटायचे. 
- चंद्रा यांनी जानेवारीत त्यांच्या नियुक्तीच्या दिवशीच हे सांगत संकेत दिले होते की, टाटा सन्सने इतर देशांना दिशा देणारे बिझनेस केले आहेत. चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात त्यांनी बिझनेस केला आहे. 
- चंद्रा यांच्यासमोर असणाऱ्या इतर अडचणी म्हणजे, रतन टाटा यांना ड्रीम प्रोजेक्ट नॅनो. टाटा मोटर्सने तोट्यासाठी याला जबाबदार ठरवले आहे. 
- सायरस मिस्त्री यांना पिपल्स कारचा प्रोजेक्ट बंद करायचा होता. त्यामुळे हा प्रवास सुरू ठेवायचा की नाही याबाबत चंद्रशेखरन यांना निर्णय घ्यावा लागेल. कारण यामध्ये आधीच 1,000 कोटींचे नुकसान झालेले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...