आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस्त्रींच्या आरोपांमुळे टाटा समूहाचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा सन्सने आता आपले माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्यावर टीसीएसचे “मोठे नुकसान’ केल्याचा आरोप केला आहे. मिस्त्री यांच्या वागण्यामुळे कंपनीचे शेअरधारक आणि कर्मचाऱ्यांचेही नुकसान झाले असल्याचे टीसीएसच्या वतीने मुंबई शेअर बाजारात दिलेल्या एका फाइलमध्ये सांगण्यात अाले आहे. टाटा सन्सचा मिस्त्रींवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. कंपनीने शेअरधारकांना नोटीस पाठवली असून, ज्यामध्ये मिस्त्री यांना संचालक पदावरून काढण्यासाठी १३ डिसेंबर रोजी ईजीएम बोलावण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांना आधीच अध्यक्षपदावरून दूर केले आहे. टीसीएसमध्ये टाटा सन्सची ७३.२६ टक्के इक्विटी आहे.

टाटा सन्सने सांगितले की, कार्यकारी अध्यक्ष पदावरून काढल्यानंतर मिस्त्री यांनी अनेक बिनबुडाचे आरोप केले आहेत. यामुळे टाटा सन्स आणि त्याच्या संचालकांचेच नाही तर पूर्ण टाटा समूहाची बदनामी झाली आहे. टाटा समूहाच्या भविष्यासाठी त्यांना अध्यक्षपदावरून काढणे अत्यंत आवश्यक झाले होते. कंपनीने टीसीएसला ‘टाटा’ ब्रँडचे फायदेदेखील दाखवले आहेत.
इंडियन हॉटेल्सची ईजीएम २० डिसेंबरला
मिस्त्री यांना संचालक पदावरून काढण्यासाठी इंडियन हॉटेल्सने २० डिसेंबरला ईजीएम बोलावली आहे. यामध्ये टाटा सन्सची २८ टक्के भागीदारी आहे. मिस्त्री इंडियन हॉटेल्सचेही अध्यक्ष आहेत. चार नोव्हेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वतंत्र संचालकांनी मिस्त्री यांचे समर्थन केले होते. टाटा सन्सने टाटा मोटर्स आणि टाटा केमिकल्सलाही मिस्त्री यांना काढण्यासाठी ईजीएम बोलावण्यास सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...