आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीच्या मूल्यांशी विसंगत कारभार, सायरस यांना ‘टाटा’; संचालक मंडळ होते नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उद्योग जगताला धक्का देणारी घटना सोमवारी घडली. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाने घेतला. नेतृत्वातील अचानक बदलामागील कोणतेही कारण देण्यात आलेले नसले तरी सायरस यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर संचालक मंडळात नाराजी होती. कंपनीची तत्त्वे आणि मूल्यांशी विसंगत अशा कारभाराचा ठपका सायरस यांच्यावर ठेवण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

िमस्त्री पायउतार झाल्यामुळे रतन टाटा यांच्याकडे चार महिन्यांसाठी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात अाली अाहे. चार महिन्यांत नवा अध्यक्ष निवडण्यासाठी रतन टाटा यांच्यासह पाच जणांची समिती नेमण्यात अाली अाहे. दरम्यान, सायरस यांच्या शापूरजी पालनजी या कंपनीने हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यास न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

टाटा समूहाचे अध्यक्षपद साेडण्याचा िनर्णय रतन टाटा यांनी घेतल्यानंतर िमस्त्री यांनी २९ िडसेंबर २०१२ राेजी अध्यक्षपद स्वीकारले. त्यांना कंपनीची उलाढाल ४०० अब्ज डाॅलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य देण्यात अाले हाेते. मात्र, पीछेहाट हाेऊ लागल्यामुळे कंपनी संचालकांना हा िनर्णय घ्यावा लागला. ४२ व्या वर्षी अध्यक्षपदाची सूत्रे अाल्यानंतर ४८ व्या वर्षी सायरस यांना पायउतार व्हावे लागले, तर रतन टाटा ७८ व्या वर्षी पुन्हा अध्यक्ष झाले आहेत.

नव्या अध्यक्षांच्या िनवडीसाठी समिती
> रतन टाटा, हंगामीचेअरमन, टाटा ग्रुप
> वेणूश्रीिनवासन, प्रमुख,टीव्हीएस समूह
> अमितचंद्र, बेनकॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक अाणि िबगर कार्यकारी अध्यक्ष
> रोनेन सेन,माजीराजनैितक अिधकारी
> लाॅर्ड कुमार भट्टाचार्य, संस्थापक,वारविक मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप, ब्रिटन
(भट्टाचार्यखेरीज सर्व टाटा संचालक.)

याआधी समूहाच्या कोणाही चेअरमनला हटवण्यात आलेले नाही. ते निवृत्त झाले आहेत. विशेष म्हणजे बिगर टाटा चेअरमन फार काळ टिकत नाही. सकलतवाला सहा वर्षे चेअरमन राहिले. सायरस मिस्त्री चार वर्षे. जेआरडी टाटा ५३ वर्षे, तर रतन टाटा २१ वर्षे चेअरमन होते.


रतन टाटा िडसेंबर२०१२पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष होते. टाटा माेटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पाॅवर, टाटा ग्लाेबल बिव्हरेजेस, टाटा केमिकल्स, इंिडयन हाॅटेल्स टाटा टेिलसर्व्हिसेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. त्यांच्या काळात समूहाची उलाढाल वाढून २०११-१२ या कालावधीत १०० अब्ज डाॅलरवर गेली. परंतु सायरस यांच्या कामगिरीवर संचालक मंडळ नाराज हाेते. युराेपमधील पाेलाद उद्याेगासह अन्य िबगर नफा िमळवणाऱ्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून नफा देणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यावरच लक्ष देण्याच्या पद्धतीवर संचालक मंडळाची नाराजी हाेती. िमस्त्री यांनी समूहाच्या मासिकातील मुलाखतीत उद्याेगाला सक्षम करण्यासाठी कठाेर िनर्णय घेण्याची गरज बोलून दाखवली. परंतु याच्या नेमके उलट पावले टाकत रतन टाटा यांनी साम्राज्य वाढवताना अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या हाेत्या. २००० मध्ये टाटा टी कंपनीने टेटली ४५० दशलक्ष डाॅलरला घेतली. पुढे २००७ मध्ये टाटा स्टीलने काेरस हा पाेलाद समुह घेतला अािण २००८ मध्ये २.३ अब्ज डाॅलर माेजून टाटा माेटारने जॅग्वार लँड राेव्हर ही कंपनी घेतली. रतन टाटा यांच्या कालावधीत २०११-१२ मध्ये महसूल लाख ७५ हजार ७२१ काेटीवर पाेहाेचला. (१९९१ मध्ये १० हजार काेटी होता.) समूहाची २०१४-१५ मधील उलाढाल १०८ अब्ज डाॅलर हाेती. ती मागील वर्षात १०३ अब्ज डाॅलरवर अाली. कर्जाचा भार मार्च २०१५ला २३.४ अब्ज डाॅलर हाेता. मार्च २०१६ला तो वाढून २४.५ अब्ज डाॅलरवर गेला.
बातम्या आणखी आहेत...