आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्ड रूमचा संघर्ष कोर्ट रूमपर्यंत; टाटा ट्रस्टकडून मिस्त्रींविरुद्ध तीन कॅव्हेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रतन टाटा, टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने मंगळवारी सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालय आणि नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्यूनलमध्ये कॅव्हेट दाखल केले आहेत. समूहाची कंपनी टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटवण्यात आलेले सायरस मिस्त्री यांच्याविरुद्ध हे कॅव्हेट आहेत. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाने स्थगिती किंवा अन्य निर्णय घेऊ नये असा कॅव्हेटचा अर्थ असतो.

मिस्त्री यांना सोमवारी पदावरून हटवण्यात आले तेव्हा त्यांच्याशी संबंधित सूत्रांनी ते या निर्णयाला न्यायालयात आव्हान देतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतरच टाटा यांनी कॅव्हेट दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मिस्त्री यांच्या बाजूनेही कॅव्हेट दाखल करण्यात आल्याच्या बातम्या मंगळवारी प्रसृत झाल्या, परंतु नंतर त्यांच्या कार्यालयाकडून मात्र या वृत्तांचे खंडन करण्यात आले.

तत्पूर्वी शापूरजी पालनजी समूहाने एक निवेदन काढून म्हटले आहे की, परिस्थितीचा अभ्यास सुरू असून, कायदेशीर कारवाईबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. हा समूह मिस्त्री कुटुंबाचाच अाहे. टाटा सन्समध्ये समूहाचा १८.५ टक्के वाटा आहे. बहुमताचा वाटा रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा ट्रस्टकडे आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने रतन टाटा यांना हंगामी चेअरमन केले आहे. चार महिन्यात नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली आहे.

उद्योगावर फोकस ठेवा, बदलाची चिंता नको : टाटा
हंगामीअध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यावर रतन टाटा यांनी कंपन्यांचे एमडी, सीईओंची बैठक घेऊन उद्योगावर फोकस ठेवा, उच्च स्तरावरील बदलाची चिंता करू नका, असा सल्ला दिला.

बदल थोड्या काळासाठी : समूहात स्थैर्य, सातत्य राहावे म्हणून हंगामी पद स्वीकारले. थोड्या काळासाठी ही व्यवस्था आहे. नवा कायमस्वरूपी लीडर लवकरच येईल.

लीडर व्हा, फाॅलोअर नको : कंपन्यांनी आपले बाजारातील स्थान आणि स्पर्धेवर लक्ष दिले पाहिजे. भूतकाळाशी तुलना करायला नको. लीडर होण्याचा प्रयत्न असावा, फाॅलोअर होण्याचा नको.
मिस्त्रींचे निर्णय बदलतील : समूहातील कंपन्यांत सुरू असलेल्या इनिशिएटिव्हचे मूल्यांकन सुरू आहे. आवश्यक वाटतील ते कायम राहतील. कोणत्याही बदलापूर्वी आपल्याशी चर्चा केली जाईल.

नेतृत्वापेक्षा संस्था मोठी
भूतकाळात तुमच्यासोबत केले तसेच काम यापुढेही करू इच्छितो. कोणत्याही संस्थेला नेतृत्वापेक्षा पुढे राहिले पाहिजे. मला आपल्या सर्वंाचा अभिमान वाटतो. चला एकजुटीने समूहाचे काम पुढे नेऊ या.

ब्रेकिंग पाॅइंट ठरला डोकोमोचा वाद
जपानच्या डोकोमोसोबतच्या वादातही मिस्त्री यांनी टाटांना बाजूला केले. टाटांच्या जुन्या वकिलांशी मिस्त्री यंानी संपर्कही केला नाही. डोकोमोने २००९ मध्ये टाटा टेलिसर्व्हिसेसचा २६.५ टक्के वाटा घेतला. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी व्हेंचरमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. डोकोमोने टाटास खरेदीदार शोधण्यास सांगितले. त्यात टाटा अपयशी ठरले.

इरादा टाटांच्या रत्नांच्या विक्रीचा
टाटांच्या निकटवर्तीय सूत्रांनुसार, मिस्त्री टाटांच्या ‘रत्नां’ची विक्री करू इच्छित होते. टाटांचे निर्णय बाद करत होते. यात टाटा स्टीलच्या युरोपातील उद्याेगाशिवाय हॉटेल उद्योग आहे. ताज बोस्टन हॉटेल रिज कार्लटन ग्रुपची विक्री केली. न्यूयॉर्कचे हॉटेल विक्री प्रक्रियेत आहे. आयकॉनिक ब्रँड जॅग्वार लँडरोव्हरच्या प्रगतीत मिस्त्री अपयशी ठरल्याचा आरोप आहे.

शेअर ३%, बाजारमूल्य १०,७०० कोटी खाली
टाटा समूहाच्या कंपन्यांचे समभाग मंगळवारी टक्क्यांपर्यंत कोसळून बंद झाले. दिवसभरातील व्यवहारात घसरण ४.२ टक्के होती. प्रमुख कंपन्यांचे मार्केट कॅप १०,७०० कोटी रुपये घटले आहे. मुंबई शेअर बाजारात टीसीएसचा शेअर १.२ %, टाटा मोटर्स १.०७%, टाटा स्टील २.५ %, टाटा स्पंज ३% टाटा पॉवर १.५ % खाली आला. ब्रोकरेज फर्म हा तात्पुरता परिणाम मानते.
बातम्या आणखी आहेत...