आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळींच्या साठेबाजांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, केंद्र सरकारचे राज्य सरकारांना निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डाळींच्या किमतीत होत असलेली वाढ पाहता सरकारच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाने (आयटी) दिल्ली, मुंबई, इंदूरसह अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांच्या गाेदामांवर छापे मारले आहेत. साठेबाजांमुळे डाळींच्या किमती वाढत असल्याचा अंदाज सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत किरकोळ बाजारात डाळींच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

डाळींची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारने बुधवारीच राज्य शासनाला दिले होते. सलग दोन वर्षांपासून देशात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे डाळींच्या किमती वाढत आहेत. गेल्या वर्षी डाळी २०० रुपये प्रति किलोवर गेल्या होत्या, त्यापेक्षा सध्याची स्थिती चांगली आहे. तरीदेखील देशातील काही भागांत डाळी ८३ ते १७७ रुपये प्रति किलोपर्यंत असल्याची माहिती बुधवारी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली होती. सरकारच्या वतीने ५०,००० टन अतिरिक्त डाळींचा साठा करण्यात आला आहे. तसेच राज्यांनी आधीच मागणी व पुरवठा यांतील फरकाची माहिती केंद्राला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारी आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून डाळी आयात करण्यात येत अाहेत. खासगी कंपन्यांनी २०१५-१६ या वर्षात ५५ लाख टन डाळी आयात केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १० लाख टन जास्त आहे. या दरम्यान सरकारने २५,००० टन डाळ आयात करण्यासंदर्भात व्यवहार पूर्ण केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डाळींच्या किमती... सरकारचे प्रयत्न ...