आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसयूव्ही, मोठ्या कारवर जास्त कर लावा, मेट्रोला प्रमोट करा; नीती आयोगाचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोठ्या कार, एसयूव्हीवर जास्त कर लावावा तसेच मेट्रो रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची शिफारस नीती आयोगाने केली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे नीती आयोगाला वाटते. राष्ट्रीय ऊर्जा धोरणाच्या आराखड्यावर नीती आयोगाने हा सल्ला दिला आहे. यानुसार मोठ्या कार/ एसयूव्हीवर कर वाढवल्याने कमी इंधनावर चालणाऱ्या कारला प्रोत्साहन मिळेल. लोकांना इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार घेण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. आयोगाने या प्रस्तावित धोरणाच्या आराखड्यावर १४ जुलै पर्यंत लोकांनी सूचना करण्याचे आवाहन देखील केले आहे. मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेच्या प्रगतीवर खाजगी वाहतुकीची कार्यकुशलता अवलंबून असल्याचे मत या आराखड्यात व्यक्त करण्यात आले आहे. भारतात हवेची गुणवत्ता, विशेष करुन शहरांमध्ये, ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात ऊर्जेचा वापर जास्त होतो, तेथे ऊर्जा धोरणाच्या माध्यमातून कडक निर्णय घेण्याची गरज आहे.  

सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या एका निर्णयात दिल्लीमध्ये २००० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या डिझेल गाड्यांवर बंद घातली होती. त्या नंतर हे प्रकरण सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय झाला होता. मात्र, गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अशा वाहनांना एनसीआरमध्ये विक्री करण्याची परवानगी दिली होती. मात्र, अशा वाहनांच्या एक्स शोरूम किमतीवर एक टक्के ग्रीन सेस लावला होता.
 
गुंतवणुकीला प्रोत्साहन
प्रस्तावित राष्ट्रीय ऊर्जा धोरणात ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल असा नियामकीय पाया उपलब्ध करून देण्यावर जोर देण्यात आला आहे. यानुसार वर्ष २०१५ ते २०४० दरम्यान २५ वर्षांत देशाच्या ऊर्जा क्षेत्रात ३.६ लाख कोटी डाॅलर (२३२.३८ लाख कोटी रुपये) गुंतवणूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...