आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांचा फायदा असेल तर दराची अडचण नाही, कंपन्यांसोबतच्या बैठकीत ‘ट्राय’ने केले स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील दूरसंचार कंपन्यांनी ट्रायच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कॉलचे स्वस्त दर आणि प्रमोशनल ऑफरशी संबंधित त्यांच्या शंका उपस्थित केल्या. त्यांनी याविषयी नियम बनवण्याची तसेच व्हॉइस डाटासाठी कमाल दर निश्चित करण्याची विनंती केली, यामुळे या दराच्या खाली एकही कंपनी ऑफर देऊ शकणार नाही.
 
वास्तविक सुरुवातीच्या पातळीवर या प्रस्तावाला ट्रायने जास्त महत्त्व दिलेले नाही. जर ग्राहकांना लाभ होत असेल तर कोणत्याही ऑफरविषयी ट्रायला अडचण नसल्याचे ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी स्पष्ट केले. मात्र, याविषयी सर्व कंपन्यांनी बहुमतावर चर्चा घेण्याची विनंती केली, तर त्यासाठीही ट्राय तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्व कंपन्यांना एक विस्तृत प्रस्ताव द्यावा लागणार आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार उद्योगातील सर्व प्रसिद्ध कंपन्यांनी या बैठकीमध्ये सहभाग घेतला असून यात जिओच्या प्रमोशनल आणि मोफत कॉलिंगमुळे नुकसान होत असल्याची तक्रार केली आहे. यासंबंधी ट्रायने नियम बनवण्याची मागणीदेखील त्यासाठीच करण्यात आली आहे. तसे नियम बनवण्यात आले नाहीत, तर भविष्यातही या उद्योग क्षेत्राला मोठे नुकसान होण्याची शक्यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. तर एका ऑपरेटरने आमच्या ऑफरमुळे कोणालाही नुकसान होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अामच्या नेटवर्कवरून इतर नेटवर्कवर कॉल गेल्यास इंटर कनेक्ट युजर्स शुल्क देण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...