मुंबई- रिलायन्स इंड्स्ट्रीजच्या 42th वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी गुरुवारी Reliance Jio 4G सेवेची अधिकृत घोषणा केली. मुकेश अंंबानी यांचे भाषण सुरु असतानाच अवघ्या 45 मिनिटांत आयडिया आणि भारती एअरटेलचे शेअर कोसळले. दोन्ही कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 11,238 कोटी रुपयांंनी कपात झाली. एअरटेलच्या 8625 कोटी तर आयडिया सेलुलरच्या मार्केट कॅपमध्ये 2613 कोटी रुपयांची घसरण दिसून आली.
टेलीकॉम कंपन्यांंचे स्टॉक्स गडगडले ...- मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात स्वस्त 4G डेटा प्लान लॉन्च केला. विशेष म्हणजे यात व्हाईस कॉलिंंग फ्री आहे.
- दुपारी एक वाजेपर्यंत बीएसईवर भारती एअरटेल 6.28 टक्केे, आयडिया सेलुलर 8.34 टक्केे रिलायन्स कम्युनिकेशन 2.18 टक्क्याने घसरले.
कंपनी | सुरुआत | 1 वाजेपर्यंत | परिणाम |
भारती एअरटेल | 331 | 310.20 | -6.28% |
आयडिया सेलुलर | 93.50 | 85.70 | -8.34% |
टाटा टेलीसर्व्हिसेज | 6.49 | 6.22 | -2.35% |
टाटा कम्यूनिकेशन | 526 | 514.25 | 2.18% |
रिलायंस कम्युनिकेशन | 55.10 | 51.65 | 4.17% |
का झाला परिणाम?
- रिलायन्सने केवळ स्वस्त डेटा प्लानच नव्हे तर मोफत कॉलिंग आणि रोमिंंगची घोषणाही केली आहे. याशिवाय व्हाइस कॉलिंंग विनामुल्य ठेवले आहे.
- कंपनीने केवळ 5 पैसे प्रति MB डेटा चार्जवर सेवा देणार असल्याचे म्हणले आहे.
- कंंपनीने 2999 रुपयांंत 4G Jio फोन लॉन्च केला आहे.
- किसी भी त्योहार पर SMS का कोई चार्ज नहीं मिलेगा।
- एअरटेल, व्होडोफोन सारख्या कंंपन्यांनी यापूर्वीच ही सर्व्हिस लॉन्च केली आहे.