आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाचे स्पष्ट संकेत मिळण्याआधी व्याजदरात वाढ नाही : जेनेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील व्याजदर ०.२५ ते ०.५० टक्क्यांवर स्थिर आहेत. ब्रेक्सिट (इंग्लंडचे युरोपीयन युनियनमधून बाहेर पडणे) तसेच अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी सुधारली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय बँकेच्या अध्यक्ष जेनेट येलेन यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षातील २०१६ मध्ये व्याजदरात वाढ होण्याची प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने होण्याची शक्यता असल्याचे मतही फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त करण्यात आले आहे. या वर्षी एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

इंग्लंड युरोपीयन युनियनमध्ये राहतो की बाहेर पडतो या निर्णयाकडे फेडरल रिझर्व्हचे लक्ष लागले आहे. जर युरोपीयन युनियनच्या बाहेर पडण्याचा निर्णय तेथील जनतेने घेतला तर जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वच देशातील अर्थव्यवस्थांवर होण्याची शक्यता येलेन यांनी व्यक्त केली आहे. येलेन यांच्यासोबतच फेडरल रिझर्व्हच्या इतर सदस्यांनीदेखील याविषयी चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकत जूनच्या सुरुवातीलाच जाहीर झालेली रोजगाराची आकडेवारी पाहता त्यात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. या आकडेवारीनुसार मेदरम्यान अर्थव्यवस्थेत ३८,००० नवीन रोजगाराची निर्मिती झाली असून, हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात नीचांकी आकडा आहे. यामुळे रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचे मत जेनेट यांनी व्यक्त केले. या कारणामुळेच व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय फेडरलच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची चिंता
चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीबाबत जेनेट येलेन यांनी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक बँकेनेदेखील जगभरातील जवळपास सर्वच देशांच्या विकासदराच्या अंदाजात नुकतीच घट केली आहे. जागतिक विकास दरात ०.५ टक्क्यांची घट करता बँकेने याला २.९ वरून २.४ टक्क्यांवर आणले आहे. काही मोठ्या अर्थव्यवस्थेत असलेली मंदी, कमोडिटीच्या दरात घट आणि व्याजदरात सुस्ती तसेच निधीच्या फ्लोमध्ये घट झाल्यामुळे जागतिक विकास दराच्या अंदाजात घट करण्यात आली असल्याचे जागततिक बँकेने सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...