आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The First Experiment Successful In The Country Of Online Licenses Was Successful

मुंबईचा आॅनलाइन परवान्यांचा देशातला पहिला प्रयोग यशस्वी; गुंतवणुकीचा वाढला ओघ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इझ आॅफ डुइंग बिझनेस अंतर्गत मुंबईच्या योगदानामुळे भारताने व्यवसाय सुलभतेत वरचे स्थान पटकावल्याने मुंबईतील उद्योग जगतात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुढच्या दोन वर्षांत मुंबईत आदरातिथ्य उद्योग, हाॅटेल व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना मिळण्याची शक्यता असून परवान्यांचे सुलभीकरण केल्याबद्दल मुंबई महापालिकेचे उद्योग जगताकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.    

राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीस चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कक्ष स्थापन करण्यात आला. विविध खात्यांच्या १७ विभागांच्या सेवा एकाच कक्षात देण्यात आल्या. तसेच उद्योगांच्या परवान्यांची संख्या निम्म्यावर आणण्यात आली.    
गेल्या तीन वर्षांत त्याचा चांगला परिणाम झाला. राज्यात ५०० उद्योगांमध्ये ९० हजार कोटींची गुंतवणूक झाली. त्यातून १ लाख ७० हजार नवे रोजगार निर्माण झाले. हाॅटेल व्यवसायाला लागणाऱ्या गृह विभागाच्या पाच परवानग्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आदरातिथ्य उद्योग आणि हाॅटेल व्यावसायिक खुश आहेत.  इझ आॅफ डुइंगमध्ये मुंबईच्या तुलनेत महाराष्ट्र बराच मागे आहे. लघु उद्योगांना सहकार्य करण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलल्यास महाराष्ट्राचे व्यवसाय सुलभीकरणातील स्थान उंचावेल आणि येणाऱ्या काळात देशाचे मानांकन आणखी उंचावेल, असा विश्वास एसएमई चेंबर आॅफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केला.   व्यवसाय परवान्यांच्या बाबतीत सुलभीकरणामुळे मुंबईत पुढच्या दोन वर्षांत नवे व्यवसाय आणि गुंतवणुकीत मोठी वाढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केला.   

व्यवसाय सुलभीकरणामुळे दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीचा कालावधी कमी होईल. तसेच नवी मुंबईतील नैना आणि द्रोणागिरी प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक यांनी दिली. एकूणच इझ ऑफ डुइंग बिझनेसमुळे व्यवसाय सुलभता वाढल्यामुळे मुंबईतील उद्योगांना बुस्ट मिळणार अाहे. परिणामी जागतिक बँकेच्या सुलभता निर्देशांकामध्ये भारताचे स्थान आणखी उंचावले, असा िवश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
 
जागतिक बँकेच्या यादीत यंदा भारताचा व्यवसाय सुलभता दर्जा ३० ने उसळी मारत १०० वर स्थिरावला. त्यात मुंबईचे योगदान मोठे अाहे. मुंबई महापालिकेने प्रशासनात केलेल्या बदलामुळे हे शक्य झाले आहे. 
 
मुंबई पालिकेचे योगदान  
 
-  कारखान्याच्या परवान्यांची संख्या ४६ वरबन २७ अाणली  
-  दीड लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या उद्योगांना परवाने देण्यास प्रारंभ  
-  उद्योग, व्यवसायांना परवाना मिळण्यासाठी एक खिडकी योजना  
-  परवाना २७ दिवसांत मिळण्याची हमी  
-  इमारत बांधकामासाठी ११९ परवान्यांची संख्या ५८ केली  
-  इमारत बांधकाम परवान्यांसाठी ३६० दिवसांचा कालावधी ६० दिवसांवर आणला  
-  आॅनलाइन परवाने देण्याचा देशातला पहिला प्रकल्प कार्यान्वित केला
 
> आज प्रत्येक बँकेची एसएमई शाखा असली तरी लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागतो आहे. व्यवसाय सुलभता मानांकनात वाढ झाल्यामुळे देशातील नव उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असे मत दलित चेंबर आॅफ काॅमर्सचे मिलिंद कांबळे व्यक्त केले.  
 
बातम्या आणखी आहेत...