आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Four Worst Cases Of Hyperinflation In World History

खेळणे नव्हे, नोटांच्या बंडलसोबत खेळायचे मुले; ब्रेडसाठी मोजले होते 3.5 कोटी डॉलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील बहुतांश देश एके काळात महागाईने अक्षरश: होरपळून निघाले आहेत. काही देशात तर इतकी भयावह परिस्थिती होती की, लोकांना स्वत:चे पोट भरणे देखील कठीण झाले होते. सन 1923 मध्ये जर्मनीत महागाईच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली होती. या काळात खेळणे इतके महागले होते की, मुलांना खेळण्यासाठी चक्क नोटांचे बंडल दिले जात असे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला महागाईची झळ सहन केलेल्या जगातील काही देशांविषयी माहिती देत आहोत...

जर्मनी (1923)
जर्मनी 1923 मध्ये महागाई प्रचंड वाढल्यामुळे मार्कचे (जर्मनीतील चलन) अवमुल्यन झाले होते. या काळात जर्मनीत महागाईचा दर 29500 टक्के प्रति महिना इतका होता. वस्तूच्या किंमती अवघ्या तीन दिवसांत दुप्पट झाल्या होत्या. सन 1914 मध्ये एका डॉलरचे मूल्य 4.2 मार्क बरोबर होते. ऑगस्ट1923 मध्ये अचानक एक डॉलरचे मुल्य 10 लाख मार्क इतके वाढले होते. इतकेच नव्हे तर ऑक्टोबर 1923 मध्ये एक डॉलरसाठी 23.8 कोटी जर्मन मार्क मोजावे लागत होते.

नोटांच्या बंडलसोबत खेळायचे मुले...
या काळात लोक घराच्या भिंतींवर अक्षरश: नोटा चिटकवत होते. कारण भिंतीला लावला जाणारा पेंट खरेदी करणे मध्यमवर्गीच काय तर उच्चवर्गीयांच्या देखील अवाक्याच्या बाहेर गेले होते. तसेच खेळणे देखील महागले होते. त्यामुळे लोक मुलांना नोटांचे बंडल खेळण्यासाठी देत होते.

पुढील स्लाइडवर वाचा, हंगरी देखील महागाईने होरपळला होता