आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Government Directed Of Export 40 Million Tonnes Sugar

सरकारचे धोरण : ४० लाख टन साखर निर्यातीचे केंद्राचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने साखर कारखान्यांना २०१५-१६ या वर्षात ४० लाख टन साखर निर्यात करण्याचे निर्देश दिले आहेत. साखरेचे वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत असते. कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास १४,००० कोटी रुपये देणे बाकी आहे. यामुळेच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे किरकोळ बाजारात साखरेचे थोडेफार भाव वाढतील, मात्र सरकारच्या मदतीशिवाय निर्यात करणे अवघड असल्याचे साखर उत्पादकांची संघटना इस्माने म्हटले आहे.
साखर उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साठा आहे. यामुळेच साखरेची निर्यात मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कारखान्यांना त्या प्रमाणात निर्यात करावी लागणार आहे. तसे झाले नाही तर त्याला सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन मानले जाईल, असे अन्नधान्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
हा कोटा तीन वर्षांतील साखर उत्पादनाची सरासरी पाहून निश्चित करण्यात आला आहे. कारखानदारांची इच्छा असेल तर ते दुसऱ्यांचा कोटा खरेदी करू शकतात. येत्या वर्षात
साखर उत्पादन सुरू करणारे कारखाने उत्पादनाच्या १२ टक्क्यांच्या बरोबरीत साखर निर्यात करू शकतील.
या निर्णयाचे स्वागत करतानाच इस्माचे अबिनाश शर्मा यांनी यामुळे कारखान्यांवरचे ओझे कमी होणार असल्याचे सांगितले. गेल्या एक ते दीड वर्षात साखरेचे भाव ८ ते १० रुपयांनी कमी झाले असल्याचे ते म्हणाले. जागतिक बाजारात साखरेचे भाव कमी असल्यामुळे निर्यात अवघड असली तरी सरकारच्या मदतीशिवाय निर्यात शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी केली होती मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी साखर उद्योगांना मदत करण्यासाठी ४० लाख टन साखरेच्या निर्यातीची मागणी केली होती. त्याच वेळी हा निर्णय घेण्यात आला होता.