नवी दिल्ली- जगातील काही देश असे आहेत की, तिथे विना व्हिसा (Passport) प्रवास केला जाऊ शकतो, कदाचित काही भारतीय पासपोर्ट होल्डर्सला याविषयी माहिती नसेल. विशेष म्हणजे भारत सरकारद्वारा याला मंजुरी दिली जाते. रिपोर्टनुसार, भारतीय पासपोर्ट होल्डर्सला जगातील 59 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करण्याची मंजुरी मिळाली आहे. यापैकी काही देशांमध्ये
आपल्याला 'व्हिसा ऑन अरायव्हल' ची सुविधा देखील मिळेल.
पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर
ग्लोबल फायनान्स अॅडव्हायझरी फर्म 'अर्टन कॅपिटल'ने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. याद्वारे देशांतील पॉवरफुल पासपोर्टची यादी देण्यात आली आहे. या देशांमधील प्रवाशांना जगातील इतर देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. यात सर्वात पॉवरफुल पासपोर्ट स्वीडन येथील आहेत. स्वीडन देशातील नागरिकांना जगातील 174 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करण्याची परवानगी मिळते.
भारतीय नागरिक 59 देशांत प्रवास करू शकतात 'विना व्हिसा'
जगातील 59 देशांमध्ये भारतीय नागरिक विना व्हिसा प्रवास करू शकतात. याबाबतीत मात्र, आपले शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेश खूप मागे आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या देशात विना व्हिसा करू शकतो आपण प्रवास....
(टीप: छायाचित्रांचा वापर फक्त सादरीकरण्यासाठी करण्यात आला आहे.)