आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा उद्योजकांचे सर्वात मोठे संमेलन आज हैदराबादेत; मोदी-इव्हांका ट्रम्‍प यांच्यात बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय समन्वय केंद्रात मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक उद्योजकता संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या संमेलनाचा ‘वुमेन फर्स्ट, प्रॉस्पेरिटी फॉर ऑल’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. पूर्ण संमेलनाचे चार उद्योग क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. यात ऊर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्यसेवा आणि जीवविज्ञान, अर्थविषयक तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था तसेच मीडिया आणि एंटरटेन्मेंट यांचा समावेश आहे. यात सहभागी होणाऱ्या सुमारे १,२०० उद्योजकांपैकी सर्वात कमी वयाचा उद्योजक १३ वर्षांचा, तर सर्वात वयोवृद्ध उद्योजक ८४ वर्षांचे आहेत. अमेरिकेतील ३८ राज्यांचे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात सर्वाधिक भारतीय वंशाचे आहेत. ५२.५ टक्के प्रतिनिधी महिला असून हा जीईएसचा विक्रम आहे. गुंतवणूकदार - स्टार्टअप्स यांच्यात समन्वयासाठी तीन नेटवर्किंग परिसंवादाचे नियोजन करण्यात आले आहे.  


अमेरिकी विदेशी मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेल्या संमेलनासाठी देशातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी हब असलेल्या हैदराबाद शहराची निवड करण्यात आली आहे. येथे मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, अॅपल, उबेरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. सुरक्षेसाठी १०,४०० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात भारतातील एसपीजी आणि अमेरिकी सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी असतील.  

 

> १२७ देशातील १,२०० पेक्षा जास्त उद्योजक भाग घेतील जीईएस-२०१७ मध्ये
४०० प्रतिनिधी भारत, ३५० अमेरिका आणि उर्वरित इतर देशातून येतील.

 

> ३०० गुंतवणूकदार असतील जगभरातील, जे गुंतवणूकीसाठी स्टार्टअप्सची निवड करतील.
१०० स्टार्टअप्सचे उत्पादने अन् सेवांचे प्रदर्शित करण्यात येतील.  

 

> ३१.५% उद्योजक ३० किंवा त्यापेक्षा कमी वयाचे. युवा उद्योजकांचे सर्वात मोठे संमेलन

 

> १० देशांच्या चमूत केवळ महिलाच. यात सौदी अरेबिया, अफगाणिस्तान व इस्रायलही

 

६६% तंत्रज्ञान कंपन्यांच्या मंडळात एकही महिला नाही  

३० वर्षांत सुमारे ३०,००० स्टार्टअप कंपन्यांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या सिलिकॉन व्हॅली बँकेने गेल्या वर्षी कॉर्पोरेट जगतातील वरिष्ठ पदावर महिलांच्या भागीदारीवर एक अहवाल जारी केला होता. या अहवालानुसार अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि जीवविज्ञान क्षेत्राशी संबंधित ४६ टक्के कंपन्यांमध्ये महिला महत्त्वाच्या पदावर नाहीत. याव्यतिरिक्त ६६ टक्के कंपन्यांच्या संचालक मंडळात एकाही महिलेचा समावेश नाही.  

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मोदी-इव्हांका यांच्यात 20 मिनिट बैठक...

बातम्या आणखी आहेत...