आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Result Has Been Less Than Two Years Of Low Inflation, Retail Prices Of Pulses And Vegetables

किरकोळ महागाई दोन वर्षांच्या नीचांकावर भाजीपाला आणि डाळींचे दर कमी झाल्याचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात विक्रमी घट नोंदवण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर दोन वर्षांच्या नीचांकी ३.६३ टक्क्यांच्या पातळीवर आला आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर ४.२ आणि सप्टेंबरमध्ये ४.३९ टक्क्यांवर होता.
खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळेच किरकोळ महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. नोटाबंदीमुळे नगदी पैशाची चणचण वाढल्यामुळेदेखील मागणी कमी झाली आहे.
त्याचाही परिणाम महागाई दरावर झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नोव्हेंबर २०१४ नंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वाधिक कमी महागाई दर नोंदवण्यात आला आहे.

महागाई दरात ही घसरण विशेषकरून खाद्यपदार्थांच्या किमतीत आलेल्या घसरणीमुळे दिसून आली आहे. नोव्हेंबर महिन्यात खाद्य महागाई निर्देशांक २.११ टक्के नोंदवण्यात आला, जो ऑक्टोबर महिन्यात ३.३२ टक्क्यांवर होता.
सर्वात जास्त घसरण भाज्यांच्या दरामध्ये नोंदवण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या तुलनेत भाज्या सहा टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. भाज्यांचे दर उणे ५.७४ टक्क्यांच्या तुलनेत उणे १०.२९ टक्के नोंदवण्यात आले आहे. तर डाळींच्या किमतीतही ०.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील महागाई दर ऑक्टोबर महिन्यात ४.७८ टक्के होता, जो आता ४.१३ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर शहरी भागातील ऑक्टोबर महिन्यात ३.५४ टक्क्यांवरून महागाई दर ३.०५ टक्के नोंदवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...