आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियन कंपनी खरेदी करणार सन फार्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी ओषधी कंपनी सन फार्मा रशियामधील कंपनी जेएससी बायोसिंटेज खरेदी करणार आहे. सन फार्माने रशियन कंपनीमध्ये ८५.१ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा सौदा सहा कोटी डॉलर (सुमारे ४०९ कोटी रुपये) मध्ये होणार आहे.
सन फार्मा ८५.१ टक्के भागीदारीसाठी २.४ कोटी डॉलर (१६३.८० कोटी रुपये) देणार आहे. तसेच उर्वरित ३.६ कोटी डॉलरचे (२४५.७० कोटी रुपये) रुसी कंपनीवर असलेले कर्ज भरण्यात येणार आहे. या सौद्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळणे अद्याप बाकी आहे. या वर्षीच्या शेवटपर्यंत हा सौदा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सन फार्मा हा सौदा आपल्या सब्सिडिअरी कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. बायोसिंटेजचे सर्व लक्ष हॉस्पिटल सेगमेंटवर आहे. २०१५ मध्ये या कंपनीचा वार्षिक व्यवसाय ५.२ कोटी डॉलरचा (सुमारे ३५५ कोटी रुपये) होता. कंपनीला रशियन कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचे मत सन फार्माने व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...