आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकऱ्यांवर गंडांतर, बँक कर्मचारी असोसिएशनच्या सचिवांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर जगातील ५० मोठ्या बँकांमध्ये एसबीआयचा समावेश होणार आहे. मात्र, या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, असा दावा अखिल भारतीय बँक कर्मचारी असोसिएशनचे महासचिव सीएच वेंकटचलम यांनी केला आहे.
 
एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला अाहे. असे असले तरी ऑटोमेशनमुळे रोजगार गमावणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा खूप माेठी असल्याचा दावा एका एचआर संस्थेने केला आहे.  
 
एसबीआय आणि सहयोगी बँकाच नाही तर इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्येही सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील कमीत कमी २५ टक्क्यांपेक्षा जास्त अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. सर्व बँका अाता तेजीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहेत. त्यामुळे बँकांना आता डिजिटल तज्ज्ञांची आवश्यकता आहे. 
 
अनेक शाखांमध्ये तर नगदी व्यवस्थापकांचीही गरज संपली आहे. या कर्मचाऱ्यांना नव्या कामासाठी प्रशिक्षित करण्याची शक्यताही कमीच आहे. त्यांच्या जागेवर बँकांना आता तरुण तज्ज्ञांची आवश्यकता आहे. ऑटोमेशनमुळे सुमारे पाच लाख कर्मचाऱ्यांचे काम संपणार असल्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला होता. बँकादेखील ग्राहकांना कमीत कमी बँकांच्या शाखेत येण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.   
 
जगातील ४५ वी मोठी बँक
या विलीनकरणामुळे बँकेची काम करण्याची क्षमता वाढणार असून निधी जमवण्यासाठी खर्च कमी येणार आहे. यामुळे पहिल्याच वर्षी एक हजार कोटी रुपयांहून अधिक बचत होणार आहे. तसेच एसबीआयची एकूण संपत्ती ३७ लाख कोटी रुपये होणार आहे.
 
यामुळे २२,५०० बँक शाखा आणि ५८,००० एटीएमचे मोठे नेटवर्क उभे राहणार आहे. सध्या एसबीआयच्या १६,५०० बँक शाखा आहेत. यात ३६ विविध देशांमधील १९१ शाखांचा समावेश आहे. या विलीनकरणानंतर ग्राहकांची संख्या वाढून ५० कोटींहून अधिक होणार आहे.
 
या बँकेचे होणार विलीनीकरण  
- स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (लिस्टेड)  
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर (लिस्टेड)  
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (लिस्टेड)  
- स्टेट बँक ऑफ पटियाला  
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
 
अधिकारीच जास्त
एकूण कर्मचारी ११,७५,१४९
अधिकारी    ५,०२,९३८
कारकून    ४,८१,४२१
सहायक    १,९०,७९०
 
एसबीआय व सहयोगी 
एकूण कर्मचारी २,८५,३७०
अधिकारी    १०४,४४६
कारकून    १२५,८७८
सहायक    ५५,०२६
बातम्या आणखी आहेत...