आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Sensex Gained 299 Points To Increased Buying

खरेदी वाढल्याने सेन्सेक्स २९९ अंकांनी वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्रीसलामिळणाऱ्या सुधारणा मदतीचा निर्णय झाल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्यापेक्षा जास्तीची वाढ झाली. विदेशी बाजारातील खरेदीचा देखील भारतीय बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे सेन्सेक्स २९९ अंकांच्या वाढीसह २७,९६१ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी १.१९ टक्के म्हणजेच १०० अंकाच्या वाढीसह ८४५९ च्या पातळीवर बंद झाला. सरकारी बँका, ऑटो, फायनान्स आणि आयटी शेअरमध्ये जास्त खरेदारी झाली. त्यामुळेच बाजाराला मोठा फायदा मिळाला.
मंुबई शेअर बाजारात देखील जवळपास सर्वच शेअर हिरव्या निशाणीवर बंद झाले. सोमवारी आयटी, टेक्नॉलॉजी, ऑटो, फार्मा, ऑइल अँड गॅस आणि पॉवर शेअरमध्ये चांगली खरेदारी झाली. त्यामुळेच बाजारात वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील आयटी टेक्नॉलॉजी, ऑटो, फार्मा, ऑइल आणि गॅस तसेच पाॅवरचे इंडेक्स १.७ ते १.२५ टक्के वाढून बंद झाले, तर बँक निफ्टी जवळपास टक्के वाढीसह १८९०० च्या जवळ बंद झाला.

ग्रीसला मदत मिळणार असली तर आता नियम आणि अटींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या वेळी सर्व नियम हे कडक असतील. युरोपियन युनियनच्या अटी जर बँकांसाठी उपयुक्त असतील तर पुढील काही दिवसांतच ग्रीसमधील बँका उघडण्याची शक्यता आहे. -राधिकाराव, अर्थतज्ज्ञ, डीबीएस बँक.

मोठे शेअर वाढले
सोमवारीआठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठे शेअर जसे की, एचसीएल टेक, जी एंटरटेनमेंट, इंडसइंड बँक, एचडीएफसी, मारुती सुझुकी, एनटीपीसी आणि विप्रो सर्वात जास्त ३.८ ते २.२ टक्क्यांपर्यंत मजबुतीसह बंद झाले. वास्तविक यात ओएनजीसी १.१, तर एल अँड टी टक्का खाली बंद झाले.