आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग 10 व्या वर्षी एसअँडपीकडून भारताच्या मानांकनात बदल नाही; प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जागतिक गुणांकन संस्था स्टँडर्ड अँड पुअर्सने (एसअँडपी) भारताच्या मानांकनात कोणताच बदल केलेला नाही. संस्थेने भारताला “बीबीबी’ मानांकनासह स्थिर आऊटलूकवर ठेवले अाहे. एसअँडपीने ३० जानेवारी  २००७ ला भारताचे मानांकन बीबी+ वाढवून बीबीबी केले होते.  गुंतवणुकीच्या  दृष्टीने  हे नीचांकी मानांकन मानले जाते. संस्थेने आर्थिक मजबुतीसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असले तरी अजूनही भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न खूपच कमी आणि राजकोशीय तूट खूप जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे. समान गुणांकन असलेल्या देशांमध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न सर्वात कमी आहे. मात्र, विकास दर सर्वात जास्त आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये केलेल्या समीक्षेत एसअँडपीने आणखी दोन वर्षे भारताच्या मानांकनात वाढ करणार नसल्याचे म्हटले आहे.  


मुडीजने १३ वर्षांनंतर मागील शुक्रवारीच जारी केलेल्या अहवालात भारताचे मानांकन “बीएए-३’वरून वाढवून “बीएए-२’ केले होते. आर्थिक सुधारणांमुळे येथील विकासाच्या शक्यता वाढल्या असल्याचे मुडीजने म्हटले आहे. तिसरी प्रमुख गुणांकन संस्था असलेल्या फिचनेही भारताचे मानांकन बीबीबी कायम ठेवले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे सलग दोन तिमाहींमध्ये विकास दरात घसरण झाली असली तरी २०१८-२०२० दरम्यान विकास दर चांगला राहणार असल्याचे एसअँडपीने म्हटले आहे. राजकोशीय तूट नियंत्रणात राहून विदेशी गंगाजळीत वाढ कायम राहणार असल्याची अपेक्षाही यात व्यक्त करण्यात आली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारी गुंतवणूक आणि बँकांना निधी दिल्याने गुंतवणुकीत वाढ होईल, असेही अहवालात म्हटले आहे.

 

१० वर्षांत चार वेळा बदलले आऊटलूक

एसअँडपीने जानेवारी २००७ मध्ये भारताला बीबीबी- मानांकनासह ‘स्थिर’ आऊटलूक दिले होते. २००९ मध्ये आऊटलूक कमी करून नकारात्मक केले आणि पुन्हा २०१० मध्ये स्थिर केले होते. २०१२ मध्ये आऊटलूक पुन्हा नकारात्मक केले. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर २०१४ मध्ये वाढवून पुन्हा स्थिर केले. 

 

 गुणांकनात वाढ होण्याची अपेक्षा कधी 

> राजकोशीय तुटीमध्ये मोठी घट झाली 
> सरकार कर्ज कमी करण्यात यशस्वी झाले 
> विदेशातील स्थिती मजबूत झाली 
 मानांकन कमी होण्याची शक्यता कधी 
>  जीडीपी वाढ नकारात्मक राहिली 
> राजकोशीय तुटीत वाढ झाली 
> सुधारणेची राजकीय इच्छाशक्ती कमी झाली 

 

पुढील स्‍लार्इडवर पाहा, प्रतिव्यक्ती उत्पन्न...

बातम्या आणखी आहेत...