आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी न सोडण्यासाठी मिळाले 305 कोटी रुपये, हा आहे Google चा सर्वात शक्तीशाली भारतीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: या महिन्याच्या शएवटी गुगलची I/O कॉन्फ्रेंस आहे. 28 मेपासून सुरू होणार्‍या या कॉन्फरन्समध्ये अँड्रॉईडचे पुढील व्हर्जन (एंड्रॉइड M 6.0) लॉन्च होऊ शकते. अँड्रॉईड प्रोजेक्टमध्ये एक सर्वात मोठे नाव आहे सुंदर पिचाई यांचे. मागील वर्षी अँड्रॉईड L (अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0) सुध्दा यांनीच प्रेझेंट केले होते.
सुंदर पिचाई जे पूर्वी गुगलचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट (अँड्रॉईड , क्रोम आणि अॅप्स डिविजन) होते. ऑक्टोबरमध्ये कंपनीने त्यांना नवे प्रोजेक्ट चीफ बनवले. सुंदर पिचाई हे टेक वर्ल्डमधील एक मोठे नाव आहे. अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम डेव्हलपमेंटमध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे. सुंदर पिचाई मागील १० वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. आज DivyaMarathi.com तुम्हाला सांगणार आहे सुंदर पिचाईबद्दलची इतर कोणाला जास्त माहित नसलेली माहिती -
गूगलकडून मिळाले होते 50 मिलियन डॉलर (३०५ कोटी) )
mensxp.com ने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने 2011 मध्ये पिचाई यांना नोकरीची ऑफर दिली होती, मात्र गुगलने त्यांना 50 मिलियन डॉलर (जवळपास 3053250000 रुपये म्हणजेच 305 कोटी रुपये) देऊन थांबवून घेतले.
पुढील स्लाईडवर वाचा, गुगलचा दुसरा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती