आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • This A Good Time To Purchase Gold Jewellery, Price Of Gold Is Lowest After 16 Years

सोन्याची चकाकी हरवली, 1999 नंतर पहिल्यांदा एवढे घसरले सोने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सोन्याच्या दरात 16 वर्षांनंतर पहिल्यांदा विक्रमी घट पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर 25 हजारांच्या खाली घसरले आले आहे. 1999 नंतर पहिल्यांदा सोने एवढे स्वस्त झाले आहे. येत्या सहा सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 20 हजार रुपयांनी खाली येण्याची शक्यता इंटरनॅशनल जर्नल फॉर बुलियन इंडस्ट्रीने (बुलियन बुलेटिन) व्यक्त केली आहे.
देशात 16 वर्षांनंतर प्रथमच सोन्याच्या दराने हा नीचांकी पातळी गाठली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात तर सोने साडेपाच वर्षांच्या नीचांकी पातळीत आले आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात व्याजदर वाढीची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदार सोन्यापासून दूर जात असल्याचे मत बुलियन तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दिल्ली सराफ बाजारात महिन्यापूर्वी सोने 26 हजारांच्या आसपास होते. आता सोने प्रति तोळा 25 हजारांखाली आले आहे. तसेच सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34ग्रॅम) 1085.08 डॉलरपर्यंत घसरले आहे. मजबूत होणारा डॉलर, अमेरिकेतील संभाव्य व्याजदर वाढ आणि घटलेली मागणी यामुळे सोन्याची चकाकी हरवली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (22 कॅरेट- 10 ग्रॅम)
मुंबई-23,670 रुपये
जळगाव- 23670 रुपये
नाशिक-23,670 रुपये
पुणे- 23,670 रुपये
औरंगाबाद- 23,780 रुपये
नागपूर- 23,670 रुपये
कोल्हापूर- 23,670 रुपये

घसरणीची कारणे
- अमेरिकेत सप्टेंबरमध्ये होणारी संभाव्य व्याजदर वाढ.
- चीनमधून घटलेली मागणी.
- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा वधारलेला भाव.
- देशातील घटलेली मागणी.
- शेअर बाजारातील तेजीतील सातत्य

पुढील स्लाइडवर वाचा, देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दिवशी...