आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र म्हणाला- तू काय फ्लॅट घेणार, या भारतीयाने बुर्ज खलिफात घेतले 22 फ्लॅट्स, बघा INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- जॉर्ज व्ही. निरयाम पारम्पिल यांचा जन्म केरळमधील. ११ वर्षांचे असतानाच स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मोठेपणी मेकॅनिक म्हणून काम शिकून घेतले. यातून पैशाची बचत केली आणि थेट दुबई गाठली. येथे एअरकंडिशनचा व्यवसाय सुरू केला. सगळीकडे वाळवंटच... मग व्यवसायात जमही बसला. एक दिवस जॉर्ज मित्रासोबत जगातील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलिफा पाहण्यासाठी गेले. मित्र म्हणाला, ही बुर्ज खलिफा आहे. १६३ मजले... येथे राहण्याची तर तुझी कुवत नाही. येथे राहण्याचे सोड, प्रवेश करण्यासाठी पण पैसे लागतात...
मित्राचे हे बोलणे जाॅर्जला चांगलेच लागले. त्यांनी यूएईमध्ये मालमत्तेचे व्यवहार सुरू केले. एक दिवस वृत्तपत्रात बुर्ज खलिफातील फ्लॅट विक्रीस असल्याची जाहिरात त्यांनी वाचली. बचतीतील पैसे जमा करून पहिला फ्लॅट घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. सहा वर्षांत त्यांनी चक्क २२ फ्लॅट खरेदी केली. एका व्यक्तीने या इमारतीत इतके फ्लॅट खरेदी करणारे ते एकटेच.
जॉर्ज सांगतात, एखादा मोठा व्यवहार झाला तर मी आणखी जमीन खरेदी करतो. मी स्वप्न पाहणारा माणूस आहे. ११ वर्षांचा असतानाच मी हे स्वप्न पाहिले हाेते. माझे वडील कापसाची शेती करत. मी तो बाजारात विक्री करून नंतर शाळेत जात होतो.१९७६ मध्येदुबईत आलो.
एअरकंडिशनरचा व्यवसाय सुरू केला. यासोबत मालमत्तेचे व्यवहारही सुरू झाले. एक दिवस बुर्ज खलिफा पाहण्यासाठी आलो आणि मित्राने डिवचले. यातून जिद्द निर्माण झाली. या इमारतीत एकूण ९०० फ्लॅट आहेत. आता मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. विशेषत: वीजनिर्मितीचे माझे स्वप्न आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्वप्नवत असलेल्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वांत उंच इमारतीचे इनसाईड फोटो.... तुमचे डोळे पांढरे होतील.... असे आहे ऐश्वर्य....
बातम्या आणखी आहेत...