आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहाल करु शकला नाही ते या हिंदुस्तानी मंदिराने करुन दाखवले, जिंकले युनिस्कोचे अवॉर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अनेक वर्षांची मेहनत आणि हिंदू भाविकांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. तमिळनाडूच्या या भव्य मंदिराने जे काही करुन दाखवले ते ताजमहालही करु शकला नाही. तिरुचिरापल्लीत सुमारे ६,३१,००० वर्गमीटर परिसरात असलेल्या श्री रंगनाथस्वामी मंदिराला युनिस्कोने एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट २०१७ ने गौरविले आहे.
 
या अवॉर्डसाठी एशिया प्रशांत क्षेत्रातील सुमारे १० देशांमधून प्रोजेक्ट आले होते. पण त्यातून या मंदिराची निवड झाली आहे. सुमारे २५ कोटी रुपये खर्च करुन या मंदिराचे रेनोव्हेशन करण्यात आले होते. त्याच्या बळावर या मंदिराची निवड झाली असल्याचे सांगितले जात आहे. या अवॉर्डसाठी ताजमहालाचेही नाव सुचविण्यात आले होते. पण अवॉर्ड जिंकण्यात ताज मात्र मागे पडला.
 
अशा केल्या सुधारणा
या मंदिराकडे सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले होते. मंदिराची स्थिती अत्यंत खराब झाली होती. त्यानंतर काही संस्था पुढे आल्या. मोठा निधी गोळा करण्यात आला. मंदिरावर पैसे खर्च करण्यात आले. त्यानंतर मंदिराची जुनी रौनक परत आली. या मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली.
 
पुढील स्लाईडवर बघा, भारतातील या मंदिराचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...