आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने विदेशी गुंतवणुकीच्या नियमात अाणखी सुलभता अाणण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील बँकांना नव्याने निधी उभारण्यासाठी माेठी चालना मिळू शकणार अाहे. त्यातून बाजारात झालेल्या खरेदीमध्ये बँक समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्स २४८ अंकांची उसळी घेत २८,४४६.१२ अंकांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
विदेशी थेट गुंतवणुकीच्या नियमात येत असलेली सुलभता, जागतिक शेअर बाजाराची सुस्थिती अाणि विदेशी निधीचा माेठ्या प्रमाणावर येत असलेला निधी यामुळे निफ्टीदेखील ८६०८.०५ अंकांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला.

विदेशी थेट गुंतवणुकीसाठी एकच नियम असल्यामुळे अार्थिक यंत्रणेत माेठ्या प्रमाणावर निधीचा अाेघ येण्याच्या अपेक्षेमुळे बाजारात वाढ झाल्याचे मत हेम िसक्युरिटीजचे संचालक गाैरव जैन यांनी व्यक्त केले. क्षेत्रीय मर्यादा सुनिश्चित करण्यासाठी विदेशातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या वेगवेगळ्या नियमांएेवजी एकच नियम केल्यामुळे विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये सुसूत्रता येण्यास मदत हाेणार अाहे.

निफ्टीत मोठी वाढ
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,२५९.७० अंकांच्या कमाल पातळीवर उघडला अाणि दिवसअखेर ताे २४७.८३ अंकांनी वाढून २८,४४६.१२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ८४.२५ अंकांनी वाढून ८६०८.०५ अंकांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.
काही बड्या कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सला मदत झाली. अाता गुंतवणूकदारांना अमेरिकेतून येणाऱ्या काही अाकडेवारीचे वेध लागले अाहेत, त्यामुळे बाजाराला पुढची दिशा मिळण्यास मदत हाेईल, असे मत व्हेरासिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट यांनी व्यक्त केले.

जागतिक शेअर बाजारांमध्ये युराेप, फ्रान्स, िब्रटन अाणि जर्मनी शेअर बाजारात चांगली वाढ झाली. अाशियामध्ये चीन, हाँगकाँग, िसंगापूर, दक्षिण काेरिया शेअर बाजारात वाढ झाली. पण तैवान शेअर बाजारात घसरणीचा सूर हाेता.

बँक समभागांना भाव
अॅक्सिस बँक, काेटक बँक, येस बँक, एचडीएफसी बॅँक, स्टेट बँक, अायसीअायसीअाय बँक

टाॅप गेनर्स
भेल, एचडीएफसी, िसपला, डाॅ. रेड्डीज लॅब, अायटीसी, िरलायन्स, एनटीपीसी, हिंदाल्काे.
बातम्या आणखी आहेत...