आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ticket Jugaad App For Easy Booking Of Confirm Train Seats

तुमच्याकडे वेटिंग लिस्टचे तिकीट आहे, या जुगाड App च्या मदतीने करा कन्फर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर/कोलकाता- रेल्वेने प्रवास करायचा आहे. परंतु, तिकिट कन्फर्म नाही. वेटिंगही जास्त आहे. या समस्येला दूर करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी 'तिकिट जुगाड' अॅप बनवले आहे. यात कन्फर्म तिकिटासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दुसरीकडे, अाजपासून (15 फेब्रुवारी) आयआरसीटीसीने नवा नियम लागू केला आहे. आजपासून एका यूजर आयडीवरून एका महिन्यात फक्त सहा तिकिटे बूक करता येतील.

असे काम करते 'जुगाड अॅप'
- आयआयटी खडगपूरमध्ये सेकंड ईयरचा विद्यार्थी रुनाल जाजू याने चुलत भाऊ शुभम बलदेवाच्या मदतीने हे अॅप बनवले आहे. शुभम हा एनआयटी जमशेदपूरमध्ये शिक्षण घेत आहे.
- रुनाल जाजूने सांगितले, की एकदा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आपल्या घरी जाण्यासाठी त्याला वेटिंग तिकिट मिळाली. एक्स्प्रेसमध्ये बसल्यानंतर एक बर्थ रिकामा होता. तेव्हा त्याने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा निर्धार केला.
- रुनालने सांगितले, की प्रत्येक स्टेशनवर तिकिटाचा कोटा असतो. अर्थात तुम्हाला ‘ए’ स्टेशनपासून प्रवास सुरु करायचा असेल. मात्र, तिथे कोटा फुल असेल तर या अॅपच्या माध्यमातून‘ए’ स्टेशनच्या मागील व पुढील स्टेशनचा शोध घ्यावा. तिथे कोटा रिकामा असतो.
- याच अॅपवर क्लीयरट्रिप तिकिट एजन्सीच्या मदतीने कंफर्म तिकिट बुक करु शकतात.
- तिकिट एजेंट्स एक्सपर्ट असल्याचेही जाजूने सांगितले. कोणत्या स्टेशनला किती कोटा आहे. हे त्यांना चांगले माहीत असते. ते आपल्याला सहज कन्फर्म तिकिट मिळवून देतात. मात्र, त्या आपल्याला जास्त पैसा मोजावा लागतो.
- अॅप फ्रीमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते. सर्व्हिसेससाठी पैसे लागत नाही.
- रुनाल व शुभम तिकिट बुकिंगचे लायसन्स घेण्याच्या तयारीत आहे.

जाजूच्या स्टार्टअपने मिळवले आहे दीडला लाख रुपयांचे बक्षिस
- आयआयटीच्या एंटरप्रेन्योरशिप सेलने या अॅपला सपोर्ट केला आहे. जाजूच्या या स्टार्टअपला आयआयटी खडगपूरच्या ग्लोबल बिझनेस मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये 1.5 लाख रुपयांचे फर्स्ट प्राइझ पटकावले होते.
- सध्या हे अॅप फक्त अॅंड्राइडवर काम करते. एका महिन्यात पाच हजारांहून जास्तवेळा डाउनलोड झाले आहे. वेबसाइटसोबतच अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर आणले जाणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...