आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उबरच्या आत्मघातकी वेगाने सिलिकॉन व्हॅलीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उबरचे सीईओ ट्रेविस केलेनिक : वादग्रस्त कार्यशैलीमुळे संकटात सापडले. - Divya Marathi
उबरचे सीईओ ट्रेविस केलेनिक : वादग्रस्त कार्यशैलीमुळे संकटात सापडले.
१३ जूनच्या सकाळी उबरच्या सनफ्रान्सिस्कोस्थित मुख्यालयात कंपनीचे कर्मचारी बेचैन अवस्थेत  एका तपासणी अहवालाची वाट पाहात होते. कारण फेब्रुवारी महिन्यात एका माजी महिला इंजिनियरने लेखी तक्रारीत कंपनीच्या मुख्यालयात लैंगिक शोषण आणि अयोग्य व्यवस्थापन होत असल्याचे म्हटले होते.
 
या स्फोटक आरोपांची चौकशी अमेरिकेचे माजी अॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांच्या कायदेशीर फर्मकडे सोपविण्यात आली होती. बोर्डाच्या सदस्या  एरिएना हफिंगटन यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, आम्ही जितके समजत होतो, त्यापेक्षा तपासणीची प्रक्रिया फार वेळखाऊ ठरली. यातून फार त्रासही झाला.  
 
अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा उपलब्ध करून देणारी ही कंपनी गेल्या आठ वर्षात ४५०० अब्ज रुपयांची झाली आहे. या कंपनीने सुमारे ७६ देशांतील टॅक्सी सेवा अस्ताव्यस्त केली आहे.  पण शानदार यश मिळविणारी ही कंपनी आता मात्र घोटाळ्यांच्या गर्तेत सापडली आहे. यामध्ये आहे चालकांचे बंड, नुकसानभरपाईचे खटले आणि गर्विष्ठ स्वभावाचे साईओ  ट्रेविस केलेनिक यांनी केलेल्या मान खाली घालायला लावणाऱ्या चुका. गेल्या काही महिन्यात या चुकांनी अक्षरश: उच्छादच मांडला आहे. शेवटी शेवटी तर एरिक होल्डर यांच्या अहवालाने जे ताशेरे मारले त्यावरून तर केलेनिक यांना दीर्घ सुट्टीवरच जावे लागले आणि ते जेव्हा कंपनीत पुन्हा रूजू होतील, तेव्हा त्यांची प्रतिमा डागाळलेली असेल. कंपनीच्या १४ हजार कर्मचाऱ्यांना दिलेल्या एका संदेशात केलेनिक लिहितात की,  जर आम्ही उबर-२ कंपनी बनविली तर मला त्या कंपनीचा प्रमुख बनण्यासाठी ट्रेविस-२ बनण्याची गरज पडेल.  
 
उबरवर आलेल्या संकटामुळे एका कंपनीच्या भवितव्याबरोबरच बऱ्याच गोष्टी संकटात सापडलेल्या आहेत. चालू काळात उबर कंपनी तंत्रज्ञानाची सफलता निर्धारित  करणारी कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या आणि त्या समस्या निपटण्याच्या पद्धती सिलिकॉन व्हॅलीसाठी धोक्याची घंटी आहे. २००९ साली  केलेनिक सन फ्रान्सिस्कोमध्ये आले. शहरात टॅक्सी मिळविण्यास होणारा त्रास पाहाता केलेनिक यांचे मित्र गॅरेट कॅम्प यांना अॅपच्या माध्यमातून खासगी लक्झरी कार बोलाविण्याची कल्पना सुचली. अशा प्रकारे मे २०१० मध्ये सनफ्रान्सिस्को येथे उबर कॅब सर्व्हिसचा जन्म झाला. वर्षअखेरपर्यंत केेलेनिक हे कंपनीचे प्रमुख बनले.  
 
अशा पद्धतीने  कंपनीने टॅक्सी फर्मच्या रूपात येणाऱ्या कायदेशीर अडचणीतून वाचण्यासाठी आपले नाव उबर ठेवले. या कंपनीने आपले धोरण आक्रमक ठेवले.  अनेक शहरांमध्ये टॅक्सी कंपन्यांची दादागिरी होती, त्या  कंपन्यांना उबरने खलनायक ठरवण्यास सुरुवात केली. व्यावसायिक स्पर्धेला चांगल्या आणि वाईट व्यक्तीच्या लढाईचे रूप दिले. मोठ्या कंपन्या नियमात बांधलेल्या होत्या. स्वत:ला चांगले म्हणविणाऱ्या उबरने हे नियम तोडले आणि ग्राहकाला आधिक चांगली सेवा देण्यास सुरुवात केली. कोणीही व्यक्ती उबरचा ड्रायव्हर बनून पैसे कमवू शकतो. कायद्याच्या किचकट तरतुदीतून वाचण्यासाठी ड्रायव्हर्स लोकांनी आंदोलन करूनही त्या संपकाळातही कंपनीचा व्यवसाय चांगला चालला होता.  
 
अन्य टेक्नोलॉजी कंपन्यांप्रमाणेच उबर कंपनीत पुरुष-महिला यांच्यातील भेदभाव, वंशद्वेष अशा समस्या आहेतच.  अनेक गुण असूनही सिलिकॉन व्हॅली महिला, कृष्णवर्णीय, नामवंत शाळा, कॉलेजात न शिकणारे लोक यांना सहजासहजी सामावून घेत नाही. टिंडर, स्नॅपचॅट अशा कंपन्यांमध्ये अनेक गैरप्रकार घडले आहेत.एका पाहणीत असे आढळून आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला लवकर जॉब सोडतात. जी कामे पुरुषांना करणे जमत नाही, ती कामे महिलांना सोपविली जातात. महिलांना अनैतिक संबंध ठेवण्याबाबत दबाव येतो.  
 
कशी माजली खळबळ : सॉफ्टवेअर इंजिनियर सुसन फोलर हिने फेब्रुवारी महिन्यात एका ब्लॉगपोस्टवर आपल्यावर ओढवलेला प्रसंग लिहिल्याने खळबळ माजली. उबरचे ऑफिस म्हणजे कामवासनेने पछाडलेली जागा असल्याचा हा तिचा २९०० शब्दांचा लेख होता. या ब्लॉगमध्ये एका पुरुष मॅनेजरने केलेल्या अनुचित मागण्या, मॅनेजर्स लोकांमधील पदांसाठी चालनू असलेला संघर्ष आणि अराजकतेबाबत उल्लेख करण्यात आला होता. तेव्हा केलेनिक यांनी ट्विटरवर ताबडतोब चौकशी करण्याचे आश्वासन दिले. पुढच्याच दिवशी कंपनीने होल्डर यांच्या कंपनीला याबाबत चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली.  होल्डर यांच्या कंपनीने चौकशी करून २० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. १३ पानी अहवालात अनेक सुधारणा सुचविण्यातआल्या आहेत.

इतिहासातील सर्वात किमती कंपनी
सार्वजनिक पातळीवर गर्विष्ठपणाची झलक दाखविल्याने केलेनिक यांच्यावर अनेक लोकांचा राग आहे. पण यामुळे उबरला काही फरक पडलेला नाही.  २००९ पासून आजपर्यंत कंपनीने ९५० अब्ज रुपयांपेक्षा अधिक पैसा जमा केला आहे. ही कंपनी इतिहासातील सर्वात किमती कंपनी बनली आहे. युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर मूल्य) कंपन्यांच्या काळात उबर डेकाकॉर्न (१०अब्ज डॉलरपेक्षा अधिक) झाली. आत्तापर्यंत त्यांच्या अगोदरची हेक्टोकॉर्न (१०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक) कंपनी बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
अनेक कंपन्यांनी नियम तोडले
सिलिकॉन व्हॅलीचे हीरो अनेकदा नियम तोडतात. बिल गेट्सची चांगल्या कल्पना उधार घेण्याची इच्छा, जेफ बेजोस यांच्या मोठ्या तोट्याकडे डोळेझाक , एलोन मस्कचे सद्यस्थितीचे उल्लंघन करणे अशी उदाहरणे समोर आहेत. जेव्हा स्टीव जॉब्सने  २००७ मध्ये पहिल्यांदा आयफोन दाखविला,तो फोन बनावट होता.  थेरानॉस, हेम्पटन क्रीक आणि मॅजिक लीप अशा यशस्वी कंपन्यांना जुन्या नियमांकडे डोळेझाक केल्याबद्दल ताप सहन करावा लागत आहे. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी आपले नियम स्वत:च केले.

उबरने केलेल्या चुका
महिलांशी केलेले आक्षेपार्ह वर्तन, निंदा करणे, भेदभावाच्या तक्रारीशिवाय उबरने अनेक चुका केल्या.  
- 540 कोटी रु. कंपनीने गेल्या वर्षी मेसाचुसेट्स आणि कॅलिफोर्नियामध्ये कायदेशीर नुकसानभरपाई म्हणून ड्रायव्हर्स लोकांना दिले.
- 200000 अमेरिकी अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांच्या लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातल्यानंतर कंपनीने जी प्रतिक्रिया दिली, त्याच्या निषेधार्थ इतक्या ग्राहकांनी कंपनीचे खाते बंद केले. ही संख्या एकूण ग्राहक संख्येच्या केवळ 0.5% आहे.
- 14000 गुगलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार डिव्हिजन वेमोतून चाेरी झालेल्या कागदपत्रांची संख्या. वेमो ने फेब्रुवारीत उबरच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

 
 
बातम्या आणखी आहेत...