आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक - डायरेक्ट प्लॅनमध्ये वाचणारा खर्च हा नफा ठरू शकतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही जर मार्केटमध्ये पैसे गुंतवणार असाल तर दलालाकडून गुंतवण्याऐवजी डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवा. यामुळे तुम्हाला एक टक्क्यापर्यंत फायदा मिळतो. याच एक टक्क्याचा लाभ पुढे किती मोठा लाभ होऊ शकतो, याचा अंदाज तुम्हाला लावता येणार नाही . पर्सनल फायनान्सच्या जगात चक्रवाढ व्याजाला आठवे आश्चर्य म्हटले जाते. तथापि, याच्या उलट अनेक तर्क दिले जातात. परंतु एकदा हे समजून घेतल्यास गुंतवणूकदारांसाठी नफा वाढवण्याचा हा चांगला पर्याय आहे.
जितेंद्र सोळंकी
सेबीचे नोंदणीकृत सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड आॅफ इंडियाचे सदस्य
गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडात डायरेक्ट प्लॅनची सुरुवात झाली. यात केली जाणारी गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे किंवा नाही, यावर अनेकदा चर्चा झाली. डिस्ट्रिब्युटर्स याच्या बाजूने नाहीत. कारण त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. यात त्यांना फायदा मिळत नाही. परंतु बारकाईने अभ्यास केल्यास डायरेक्ट प्लॅनचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो आहे. यातील अंतर पाहिल्यास तुम्हाला कशा प्रकारे फायदा मिळतो हे खूप चांगले लक्षात येईल.

म्युच्युअल फंडमधील डायरेक्ट प्लॅन गुंतवणूकदारांना सर्व प्रकारे फायदा देत आहेत, यात काही शंका नाही. अर्धा ते एक टक्क्याचा फरक रिकरिंग खर्चात असतो.

समजा, तुम्ही २५ वर्षे कालावधीसाठी दरमहा १० हजार रुपये जमा करू इच्छिता, तेव्हा ९ टक्क्यांचा मिळणारा परतावा, १ कोटी १२ लाख ९५ हजार ३०३ रु. इतका असेल. मात्र, ९.५ टक्क्यांप्रमाणे १ कोटी २२ लाख ८७ हजार १७२ रुपये इतका होईल. हा फरक ९ लाख ९१ हजार ८६८ रुपये इतका असेल. डायरेक्ट प्लॅनमुळे १ टक्क्यांपर्यंत फायदा मिळतो. अशा परिस्थितीत १० टक्क्यांपर्यंत परतावा जातो. तेव्हा २५ वर्षांत तुमचा परतावा १ कोटी ३३ लाख ७८ हजार ९०३ रुपये इतका येतो. म्हणजे २० लाख ८३ हजार ५९९ इतका फरक येतो. एजंटामुळे आपले नुकसान होत असेल तर त्याला दूर ठेवणे कधीही चांगले.

या सर्व परिणामास (चक्रवाढ व्याज) जगातील ८ वे आश्चर्य मानले जाते. जर तुमच्याकडून कोणी अर्धा टक्का फी घेत असेल तर आणि तुमचा परतावा वाढतो आहे, तरीसुद्धा दीर्घ कालावधीत तुम्ही चांगला परतावा प्राप्त करू शकाल. एक टक्का फीमध्ये तो आणखी वाढतो. ही रक्कम तुम्ही अतिरिक्त स्वरूपात ठेवणार की नाही? या टेबलवरून तुम्हाला चांगले समजेल.

डायरेक्ट प्लॅनला विरोध का?
चर्चेचा रोख याच मुद्द्यावर आहे. एजंटकडून अनेक कारणे डायरेक्ट प्लॅन्सच्या निमित्ताने सांगितली जातात. कारण त्यांच्या कमिशनवर याचा परिणाम होतो आहे. सुरुवातीला त्यांची कारणे खरी वाटू लागतात. पण बारकाईने अभ्यास केला आणि एजंटांनी उपस्थित केेलेल्या मुद्द्यावर आपणच माहिती सांगितली तर त्यांच्याकडे याचे उत्तर नसते. काही खालील उदाहरणे पाहा :

स्कीमची निवड - डायरेक्ट प्लॅनच्या विरोधात बोलताना एजंट सांगतात, गुंतवणूकदारांना प्लॅन्सची योग्य माहिती नसल्याने योग्य प्लॅन निवडता येत नाही. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. परंतु सेबीच्या नव्या नियमानुसार ही समस्या बऱ्याच अंशी सुटली आहे. जर कोणाच्या सल्ल्याशिवाय म्युच्युअल फंड निवडण्याची बाब असेल तर त्यामागे निश्चित काही कारण असेल. तुम्ही कोणत्याही उद्देशाशिवाय कोणत्याही असेट अलोकेशनशिवाय गुंतवणूक करता का? गुंतवणूक सल्लागार आपणास योग्य सल्ला देऊ शकतो. यासाठी कोणता म्युच्युअल फंड उद्दिष्टासाठी नाही, यासंबंधी सल्ला घेण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत सल्लागाराकडे जावे लागेल. तो तुमच्याकडून पैसे घेईल. एकदा सल्ला दिल्यानंतर तो स्वत: तुमची गुंतवणूक करण्यास जाणार नाही. यासाठी त्याला गुंतवणुकीपासून कमिशन मिळणार नसते. आता मूळ प्रश्न असा की, तुम्ही पैसा कसा आणि कोठे गुंतवाल? हे तर तुमच्यावर अवलंबून असणार आहे. गुंतवणूक सल्लागाराने डायरेक्ट प्लॅनचे फायदे-तोटे तुम्हाला समजावून सांगितले असतील. त्याचबरोबर डायरेक्ट प्लॅन न घेण्यासाठी अनेक पर्याय तुम्हाला सांगितले जातील. या गोष्टी बाजूला सारून तुम्ही सल्लागाराशी बोलले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही सल्लागाराकडे जात असाल तेव्हाच तुम्ही कोणती स्कीम घेणार आहात हे ठरलेले असते.

गुंतवणूकदारास एका क्लिकवर सगळ्या स्कीम्सचे स्टेटमेंट मिळते. ट्रान्झेक्शन मॉनिटर करण्यासाठी तुम्ही थेट सल्लागाराशी बोलू शकता.अॉफलाइन ट्रान्झेक्शन करणार असाल तर तुम्हाला रजिस्ट्रार म्हणजे केम्स आणि कार्वी इत्यादीकडे जावे लागेल.

वस्तुस्थिती - डायरेक्ट प्लॅनमुळे सर्व्हिस देणाऱ्या डिस्ट्रिब्युटरचे काम कमी झाले आहे. क्रिसिलचा एक अहवाल सांगतो, गेल्या तीन वर्षांत डायरेक्ट प्लॅनमुळे डिस्ट्रिब्युटरचे मार्केट ४३ टक्क्यांनी घटले आहे.
बातम्या आणखी आहेत...